रत्नागिरी - वाटाड एमआयडीसी विरोधात जनआक्रोश सभा

रत्नागिरी - वाटाड एमआयडीसी विरोधात जनआक्रोश सभा

Published on

वाटद एमआयडीसीविरोधात जनआक्रोश सभा
सर्वोच्च न्यायालयाचे वकील असीम सरोदे लावणार हजेरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : कोकणातील प्रस्तावित वाटद एमआयडीसीविरोधात स्थानिकांचा विरोध अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, वाटद एमआयडीसीविरोधी संघर्ष कृती समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने शनिवार (ता. १९) सकाळी १० वा. खंडळा येथील सर्वसाक्षी श्रद्धा प्रतिष्ठानमध्ये जनआक्रोश सभेचे आयोजन केले आहे. या सभेला सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध वकील आणि मानवाधिकार विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांची प्रमुख उपस्थिती असून, ते मार्गदर्शन करणार आहेत.
कोकण जो आपल्या आंबा-काजूच्या बागांसाठी आणि निसर्गरम्य परिसरासाठी ओळखला जातो. तेथील उपजीविकेचे साधन याच बागायतीवर अवलंबून आहे; मात्र प्रस्तावित एमआयडीसी आणि अदानी-अरामकोसारख्या प्रकल्पांसाठी येथील हजारो एकर जमीन कवडीमोल दराने संपादित करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. प्रशासनाकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, स्थानिकांच्या जमिनींचे संरक्षण आणि हक्कासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
संघर्ष समितीच्या माहितीनुसार, ही सभा म्हणजे कोकणातील गरीब शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या अस्तित्व आणि हक्काचा आवाज आहे. हा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम ठरेल. या सभेच्या माध्यमातून एमआयडीसीची अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, ही प्रमुख मागणी केली जाणार आहे. या कायदेशीर लढ्यात मार्गदर्शन करण्यासाठी अॅड. सरोदे हे विशेष उपस्थित राहणार असून, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे.
या सभेला प्रमुख उपस्थित म्हणून ‘शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र’चे प्रदेशाध्यक्ष अॅड. रोशन पाटील हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. सभेचे आयोजन ‘वाटद एमआयडीसीविरोधी संघर्ष कृती समिती’ने केले असून, त्यांना ‘खंडळा पंचक्रोशी सामाजिक संस्था’ आणि ‘शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र’ यांचे सहकार्य लाभले आहे. या सभेत संघर्ष समिती अध्यक्ष सहदेव वीर, उपाध्यक्ष संतोष बारगुडे, तसेच प्रथमेश गावणकर, उमेश रहाटे, चंद्रकांत धोपट, सुरेश घवाळी, दिनेश धनावडे, ओंकार शितप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

चौकट...
एकच जिद्द, वाटद एमआयडीसी रद्द...
एकच जिद्द...वाटद एमआयडीसी रद्द, या घोषणेखाली सर्व निसर्गप्रेमी, शेतकरी आणि कोकणवासीयांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोकणच्या रक्षणासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com