जिल्ह्यात पतंजलीतर्फे योग, स्वदेशीचा प्रसार
-rat१७p११.jpg-
P२५N७८१४६
रत्नागिरी : जिल्हा महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना राज्य कार्यकारिणी सदस्य रमा जोग. सोबत अनघा जोशी, सुरेखा शिंदे.
---
पतंजलीतर्फे योग, स्वदेशीचा प्रसार
रमा जोग ः महिला मेळाव्याला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : पतंजली योग समिती व सर्व परिवार रत्नागिरी जिल्ह्यात २००७ पासून जिल्ह्यात कार्यरत आहे. सनातन वैदिक धर्माचा प्रचार, प्रसार योगवर्गाच्या नियमित योगकक्षा चालवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे तसेच स्वदेशीचा प्रचारप्रसार आणि आरोग्याला हितकर व भेसळविरिहित खाद्यपदार्थ व स्वदेशी वस्तू वापरा, असे आवाहन पतंजलीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या रमा जोग यांनी केले.
महिला पतंजली योग समितीतर्फे अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात महिला मेळावा घेण्यात आला. त्यात जोग यांनी मार्गदर्शन केले. पतंजली योगपीठने स्वदेशी वस्तू सर्वांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी चिकित्सालय, आरोग्यकेंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत, असे जोग यांनी सांगितले.
या रत्नागिरी जिल्हास्तरीय महिला मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी दापोली, गुहागर, रत्नागिरी येथून बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. पदाधिकारी, योगशिक्षक, कार्यकर्ते उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या नूतन अध्यक्ष हर्षदा डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. नियमित आणि नि:शुल्क योगकक्षा चालवणाऱ्या योगशिक्षकांना हरिद्वार येथून स्वामी रामदेव यांनी प्रसाद म्हणून जॅकेट आणि औषध दर्शन मराठी पुस्तक पाठवले. अशा २० जणांना जोग यांनी सन्मानित केले. अक्षता साळवी, रागिणी रिसबूड यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. आरोही पंडित व युक्ता पंडित यांनी नृत्य सादर केले. नंदा बिर्जे यांनी गोशाळेबद्दल माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.