नव्वदीतले तरुण व्यक्तीमत्व : राजाभाऊ लिमये

नव्वदीतले तरुण व्यक्तीमत्व : राजाभाऊ लिमये

Published on

78667

इंट्रो
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, लोकनेते वसंत विष्णू उर्फ राजाभाऊ लिमये यांनी निस्वार्थीपणे अनेक समाजोपयोगी, विकासात्मक कामे केली. लोककल्याणकारी योजना गतिमान केल्या. राजाभाऊ २१ जुलै रोजी ९० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या वयातही त्यांचा उत्साह दांडगा आहे. त्यांच्या कार्याविषयी...
- मकरंद पटवर्धन, रत्नागिरी

नव्वदीतले तरुण व्यक्तीमत्व : राजाभाऊ लिमये

राजाभाऊ हे माजी मुख्यमंत्री, यशवंतराव चव्हाण, तसेच माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अत्यंत निकटचे. त्यामुळे मुरब्बी राजकारणी पण समाजासाठी प्रचंड वेळ देणारे, काम करणारे नेते. १९९२ ते १९९७ या कालखंडात राजाभाऊंनी यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. या काळात त्यांनी प्रशासनात अडकलेल्या योजना बाहेर काढून मूर्तरूपात आणून जिल्हा परिषदेच्या कामाला गती दिली. कुशल प्रशासक म्हणून त्यांनी दरारा निर्माण केला. त्यातून शिस्तबद्ध कामकाज सुरू झाले. कामाच्या बाबतीत त्यांनी कधीही तडजोड केली नाही.
राजाभाऊंना केंद्रीय नारळ विकास मंडळाचे सदस्य होण्याची संधी मिळाली. त्यांचा कोकणातील नारळ बागायतीवरील चिंतन अभ्यास लक्षात घेऊन तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांनी त्यांची नारळ विकास बोर्डावर निवड केली. त्यामुळे राजाभाऊंनी नारळ उत्पादनाचे नवे तंत्रज्ञान नारळ उत्पादित कोकणातील शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आणून पोहोचविले. विविध योजना आणल्या. विमा योजना लागू केली. केरळपेक्षा कोकणात नारळाचे उत्पादन जास्त आहे, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. नारळापासून विविध उत्पादने निर्माण करणारे प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास त्यांनी प्रोत्साहित केले आहे. कोकणातील नारळ बागायतदारांची संघटना बांधण्याचे सारे श्रेय राजाभाऊंकडे जाते. कोकणात दौरे करून त्यांनी नारळ उत्पादकांना जागृत केले व त्यांच्यामध्ये नारळ उत्पादन वाढीची व्यावसायिक जाणीव निर्माण केली.
रत्नागिरी रोटरी क्लब, रिमांड होम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा महिला पतसंस्था, रत्नागिरी जिल्हा ऑटो-रिक्षा चालक-मालक संघटना अशा अनेक संस्थांचा अध्यक्ष व संस्थापक सदस्य म्हणूनही अनेक वर्षे कार्यरत होतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागाचे अध्यक्षपदही राजाभाऊंनी भूषवले. त्यामार्फत कोकणात साहित्य, संगीत, कला, शेती, बचतगट या विविध क्षेत्रात उपक्रम हाती घेतले. गोळप, रनपार येथे छाब्रिया यांची फिनोलेक्स इंडस्ट्रीज व जयगड येथे जिंदल कंपनी आणण्यात मोठी कामगिरी केली आहे. आज या दोन कंपन्यांकडून हजारो स्थानिकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com