रत्नागिरी शहर खड्ड्यात

रत्नागिरी शहर खड्ड्यात

Published on

rat22p15.jpg-
79175
रत्नागिरी : एसटी बसस्थानकासमोरील प्रेसिडेन्सी बिझनेस हाऊससमोर मुख्य रस्त्यावर खड्डे चुकवताना वाहनचालक.
rat22p16.jpg-
79176
रत्नागिरी : रामआळीतील खड्ड्यांची स्थिती दयनीय आहे.
rat22p17.jpg-
79177
रत्नागिरी : मुख्य रस्त्यावर पाणीयोजनेचे पाईप फुटले की, खड्डे मारून ठेवतात. त्यानंतर फक्त माती टाकली जाते, डांबरीकरण होत नाही. यामुळे हा रस्ता गेली पाच वर्षे असाच आहे.
rat22p19.jpg-
79179
रत्नागिरी : एसटी स्टॅंडकडून मारूती मंदिरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जयस्तंभ येथे खड्डा नसून एक खंदकच आहे.
rat22p22.jpg-
79189
रत्नागिरी : गोखलेनाक्यावरून मारूती आळीतून जाणारा हा रस्ता पुन्हा खड्ड्यात गेलाय.
rat22p24.jpg-
N79191
रत्नागिरी- शहरातील बंदररोड (फडके उद्यान) येथील रस्ताच पूर्ण उखडला असून, त्यामध्ये डबर भरण्यात आले आहे.
rat22p25.jpg-
79192
पतितपावन मंदिरालगतच्या रस्त्यावर कायम खड्डे असतात.
rat22p26.jpg-
79193
हा कोणता तलाव नाही तर मुख्य रस्ता आहे. भुतेनाका येथे रस्त्यावरील खडी वाहून गेल्यामुळे पूर्ण रस्ता खड्ड्यात गेला आहे.
----------------

रत्नागिरी शहर खड्ड्यात
अंतर्गत रस्त्यांचीही चाळण; काँक्रिटच्या रस्त्यावरही खड्डे, नागरिक, वाहनचालक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : रत्नागिरी शहरातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी स्थिती झाली आहे. गेली अनेक वर्षे शहरातील रस्त्यांची ही दयनीय स्थिती कधी सुधारणार? आता श्रावणातील विविध सण आहेत तसेच कोकणचा गणेशोत्सवही महिन्याभरात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवून बाप्पाची स्वारी निर्विघ्नपणे घरी आली पाहिजे. स्मार्टसिटी म्हणून निवड झालेल्या रत्नागिरी शहरातील रस्ते सुधारले नाहीत तर पर्यटन व्यवसायालाही फटका बसू शकतो. रामआळी, मारूती आळी, एसटी स्टॅंड, काँग्रेस भुवन, टिळकआळी या सर्वच रस्त्यांवर खड्डे आहेत. यामुळे वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत आहे.
शहरात साळवीस्टॉपपासून मारूती मंदिरपर्यंत दोन्ही बाजूने काँक्रिटीकरण झाले आहे; मात्र मारूती मंदिर ते ८० फुटी महामार्गापर्यंत एका बाजूने काँक्रिटीकरण पूर्ण झाले. आता एका बाजूचे काँक्रिटीकरण होणे बाकी आहे. कोणत्या कारणास्तव हे काम रखडले आहे याबाबत कोणी माहिती देत नाही. जिल्ह्याची कपडे, गृहोपयोगी साहित्य, दागिने व अन्य वस्तूंची मुख्य बाजारपेठ मानली जाणाऱ्या रामआळीतील खड्ड्यांची स्थिती दयनीय आहे. खड्ड्यांमुळे ग्राहक या रस्त्यावर येतच नाहीत. यामुळे व्यापारीही नाराजी व्यक्त करत आहेत.
खड्ड्यांमुळे गाड्यांची कामे निघाली आहेत. अनेक वाहनचालकांची हाडे खिळखिळी झाली आहेत, अशी चर्चा नाक्यानाक्यावर ऐकू येत आहे. खड्ड्यांत पावसाळी डांबर नाही फक्त लाल डबर टाकल्याने पुन्हा चार दिवसांनी खड्डे मोठे होत आहेत. रस्त्यांच्या कामाचा दर्जा पाहणार कोण? आम्ही कर कशासाठी द्यायचा? अशा तीव्र भावना लोकं बोलून दाखवत आहेत. नगरपालिकेवर प्रशासक आहेत. सत्ताधारी व विरोधक प्रशासकाकडे निवेदने देत आहेत; मात्र कार्यवाही होत नसल्याबाबत नागरिक संतापले आहेत. रस्ते करण्यासाठी पालिका कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
जयस्तंभ येथे जवळपास पाच ते सहा फुटाचा खड्डा नसून, खंदकच म्हणावा लागेल. येथून जाताना वाहनचालक अक्षरश: पालिका व ठेकेदाराच्या नावाने बोटे मोडतात. गोखलेनाक्यावरून मारूती आळीतून जाणाऱ्या या रस्त्यावर खड्ड्यात पाणी साचले आहे. गेल्या आठवड्यात यावर खडी, डांबर आणून खड्डे बुजवले तरी पुन्हा खड्डे पडले.

कोट
सुंदर रत्नागिरी, स्वच्छ रत्नागिरी हे स्वप्न शहरामधील रस्त्याची अवस्था पाहता अपुरेच राहिलेले आहे. काही दिवसांपूर्वी शहरात खड्ड्यांमुळे झालेल्या एका अपघातात पादचाऱ्याला जीव गमवावा लागले आहे. शहरामधील काही रस्त्यांवर तर वाहन चालवणे सोडाच, नागरिकांना चालणेही कठीण झालेले आहे.
- रूपेश सावंत, रत्नागिरी

कोट
पावसाचा जोर कमी झाला की, रत्नागिरी शहरातील खड्डे भरण्यास सुरवात करू, असे आश्वासन मुख्याध्याकाऱ्यांनी दिले आहे तसेच कर्ला-जुवा-आंबेशेत रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरले जातील, असेही त्यांनी सांगितले.
- प्रशांत साळुंखे, शहरप्रमुख, ठाकरे शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com