रेल्वेप्रश्नी १५ ऑगस्टला लाक्षणिक उपोषण
रेल्वेप्रश्नी १५ ऑगस्टला उपोषण
नितीन जाधव ः प्रवाशांच्या प्रलंबित मागण्या
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २३ : कोकण विभागातील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ मध्यरेल्वेसह कोकण रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा करूनदेखील सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप जलफाउंडेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी केला आहे. या प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्टला येथील रेल्वेस्थानकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा रेल्वेबोर्डाला दिला आहे.
मुंबई आणि चिपळूणदरम्यान द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअरकार आणि सामान्य अनारक्षित डबे असणारी व दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापेवामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, आंजणी येथे थांबणारी नवीन नियमित गाडी सुरू करण्यात यावी.
जनशताब्दी एक्स्प्रेस, वांद्रे, पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस, एलटीटी-करमाळी एक्स्प्रेस, गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस, मडगाव-हिसार-तिरूनेलवेली एक्स्प्रेस, कोइमतूर एक्स्प्रेस या गाड्यांना येथील स्थानकात थांबा द्यावा. ४ डबे संगणकीकृत आरक्षणासाठी उपलब्ध करून देऊन रत्नागिरी पॅसेंजर दादरपर्यंत चालवावी. मडगावहून मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस आणि करमाळी-एलटीटी या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रत्नागिरी रिमोट आरक्षण कोटा एकूण क्षमतेच्या ५० टक्के इतका वाढवावा. मांडवी एक्स्प्रेस, मडगाव-एलटीटी, वांद्रे एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये सर्व स्थानकांना समान कोटा देण्यात यावा आदी मागण्या आहेत.
मांडवी एक्सप्रेसमधील ३ शयनयान डबे द्वितीय श्रेणी आरक्षित म्हणून पूर्ववत करावे. सर्वच गाड्या गोवा, कर्नाटक आणि केरळसाठी चालवण्यात येत असल्याने येथील प्रवाशांना विनाकारण स्लीपरच्या डब्यातून प्रवास करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी मुंबईपासून तुलनेने कमी अंतरावरील प्रवाशांच्या सोयीसाठी एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस, मडगाव-वांद्रे एक्सप्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांमधील एक किंवा दोन एसी थ्री टायर इकॉनॉमी डब्यांचा आणि एलटीटी टर्मिनस एक्सप्रेसमधील ५ एसी थ्री टायर डब्यांचा वापर एसी चेअरकार म्हणून करण्यात यावा, आदी मागण्यांचाही समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.