रक्तदान हे मानवता धर्माचे प्रतीक
रक्तदान हे मानवता धर्माचे प्रतीक
मनीष दळवीः वेंगुर्लेतील शिबिरात ५५ जणांकडून रक्तदान
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २४ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी रक्तदानासारखा विधायक उपक्रम राबवून भाजप कार्यकर्त्यांनी आणि सहयोगी संस्थांनी समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. रक्तदान हे माणुसकीचे प्रतीक असून अशा उपक्रमांतून तरुण पिढीला सामाजिक जाणीव जागृत होते, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
भाजप सिंधुदुर्गच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रक्तदान करूया, समाजासाठी काहीतरी करूया’ या संकल्पनेतून तालुक्यातील शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५५ जणांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या शिबिराला भरघोस प्रतिसाद लाभला.
या उपक्रमात सहयोगी संस्था म्हणून सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शिवप्रेमी ग्रुप-रेडी तसेच ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, गांधी चौक, शिरोडा यांचा मोलाचा सहभाग होता. विशेष म्हणजे वेताळ प्रतिष्ठानचे हे सलग ३१ वे रक्तदान शिबिर ठरले. शिबिराचे उद्घाटन मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, महिला मोर्चाच्या सुजाता पडवळ, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, माजी आरोग्य शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ, माजी उपनगराध्यक्ष अभी वेंगुर्लेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण परब, ज्य़ेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे, शक्तिकेंद्र प्रमुख मयुरेश शिरोडकर, महादेव नाईक, विजय बागकर, बुथ अध्यक्ष चंद्रशेखर गोडकर, प्रसाद परब, अभय बर्डे, श्रीकृष्ण धानजी, स्वप्नील तोरस्कर, मिलिंद साळगावकर, शिरोडा शहर अध्यक्ष अमित गावडे, शिरोडा युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, भाजप लोकप्रतिनिधी हेतल गावडे, अर्चना नाईक, तातोबा कुडव, सायली कुडव, आसोली उपसरपंच संकेत धुरी, सुधीर नार्वेकर, पाल शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, भाजप वेंगुर्ले युवा पदाधिकारी राहुल गावडे, भाजप पदाधिकारी विजय पडवळ, महिला मोर्चाच्या गंधाली करमळकर, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक प्रसन्न देसाई यांनी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, वेताळ प्रतिष्ठान तुळस, रिक्षा संघटना गांधीचौक शिरोडा, शिवप्रेमी ग्रुप रेडी या सहयोगी संस्थांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन तसेच उपस्थित कार्यकर्त्यांचा वृक्ष आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. शिबिरात भाजपातर्फे विशेष निमंत्रित २० रक्तदात्यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्हासह ‘जीवनदाता पुरस्कार’ देण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले. शिबिर यशस्वी पार पडण्यासाठी रुग्णालय प्रशासन, आरोग्य कर्मचारी, भाजपा स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजसेवक यांनी योगदान दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.