सिंधुदुर्ग आदर्श शिक्षक संघ
जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल कदम

सिंधुदुर्ग आदर्श शिक्षक संघ जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल कदम

Published on

swt2327.jpg
79485
विठ्ठल कदम, जे. डी. पाटील

सिंधुदुर्ग आदर्श शिक्षक संघ
जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल कदम
पाटील सरचिटणीसः कार्यकारिणी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ः राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा सिंधुदुर्गची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी विठ्ठल कदम, जिल्हा सरचिटणीसपदी जे. डी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मालवण येथील रघुनाथराव देसाई विद्यालयाच्या सभागृहात मावळते जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर, राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. जिल्हाध्यक्ष विठ्ठल कदम, जिल्हा सरचिटणीस जे. डी. पाटील, राज्य सल्लागार व जिल्हा नेते शिवराज सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप शिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष स्नेहलता राणे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद बामणीकर, संजय रासम, प्रदीप मांजरेकर, सुषमा मांजरेकर, प्रसिद्धी प्रमुख उदय गोसावी, जिल्हा संघटक आनंद जाधव, श्यामसुंदर सावंत, जिल्हा सल्लागार संजीव राऊत, प्रकाश सावंत, प्रकाश घोगळे, रावजी परब, नंदन घोगळे, सोनाली सावंत, किशोर वालावलकर यांची निवड करण्यात आली. नूतन जिल्हाध्यक्ष कदम यांनी विद्यार्थीहिताच्या उपक्रमांची अंमलबजावणी होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. नूतन‌ कार्यकारिणीचे राज्याध्यक्ष जिरवणकर व राज्य कार्याध्यक्ष शिंगारे यांनी निवडपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com