स्पॉन्डिलोसिसवर व्यायाम महत्वाचे
आरोग्यभान ः वैयक्तिक - सार्वजनिक------------लोगो
(१८ जुलै टुडे ३)
सर्वसाधारणपणे मान व कंबर यामधील मणक्यात बदल उद्भवतो व इतर मणक्यात हा क्वचित आढळून येतो. वयोमानामुळे होणारे बदल हे जरी स्पॉन्डिलोसिस चे मुख्य कारण असले तरी बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण वाढू लागले आहे. वाढते वजन, व्यायामाचा अभाव, वाढता प्रवास, रस्त्यावरील खड्ड्यामुळे जोखमीचा प्रवास याला कारणीभूत ठरत आहेत. जड व वाकून करावी लागणारी कामे तसेच सतत कित्येक तास बसून कामे केल्याने स्पॉन्डिलोसिस होऊ शकतो. मणक्याचा वात व दुखापतसुद्धा कारणीभूत ठरू शकते....!
- rat२४p४.jpg-
25N79566
- डॉ. विष्णू माधव, अस्थिरोगतज्ञ, चिपळूण
---
स्पॉन्डिलोसिसवर व्यायाम महत्वाचे
स्पॉन्डिलोसिस असलेल्या बऱ्याच रुग्णांना बरीच वर्षे काहीही त्रास जाणवत नाही. क्षुल्लक वाटणाऱ्या दुखापतीने मग याची सुरुवात होते. रुग्णांचे ३ गट प्रामुख्याने आढळून येतात
कंबरदुखी ः उठता, बसता व वाकताना कंबर दुखू लागते. काम केल्याने वेदना वाढते व झोपून आराम केल्यावर बरे वाटते. कालांतराने त्रास वाढल्यावर रोजच्या हालचाली दुखऱ्या होतात व कंबरेत ताठरता येते व बाक येऊ शकतो.
साऐटीका ः यात रुग्णाला कंबरेपासून पायापर्यंत विजेसारखी तीव्र वेदना होते तसेच चालणं जमत नाही. हा त्रास पायात जाणाऱ्या नसांवर दाब पडल्याने होतो.
क्लॉडिकेशन (Claudication) ः यामध्ये पायात जाणाऱ्या नसांचा रक्तप्रवाह खुंटल्यामुळे चालताना पाय भरत येतात व थोड्या थोड्या वेळाने थांबावे लागते किंवा बसावे लागते. वरील प्रकार वाढल्याने पायातील ताकद व संवेदना यावर परिणाम होऊ शकतो. लघवी व शौचावर ताबा सुटून कपड्यातच विधी होऊ शकते.
मणक्यातील चकतीमधील गाभा पिचकणे, हाडे व सांधेबंध किंवा लीगामेंट्समध्ये झिज होऊन पायात नसा जाणाचे मार्ग अरुंद होतात. यामुळेच मज्जातंतू सुजून लक्षणे वाढतात. एक्स-रे काढल्यास त्यात दोन मणक्यांतील अंतर कमी होणे, वेडीवाकडी हाडे वाढणे व मणक्याचा इंग्रजीतील S आकार कमी होऊन ताठपणा येणे, हे बदल दिसून येतात.
एमआरआयमध्ये मणक्यातील चकत्या, नसा आणि सांधेबंध किंवा लीगामेंट हे फक्त एमआरआयमध्येच दिसतात व मणक्याभोवती अरुंद झालेली जागा व नसांवरील दाब यांचे अवलोकन करता येते. सीटी मायलॉग्राम व ईएमजी किंवा एसी तपासणीत काही रुग्णांसाठी स्नायूचा विद्युतआलेख त्याचे कार्य निकोप आहे अथवा नाही तपासण्यासाठी करावा लागतो.
उपचार : तीव्र वेदना कमी होण्यासाठी गरम शेक, वेदनाशामक औषध, ट्रॅक्शन (वजन लावून दोन मणक्यातील अंतर वाढवणे), कंबरपट्टा, कॉलर आदी जीवनशैलीतील बदल हेही फार आवश्यक असतात जसे की, वजन कमी करणे, संतुलित आहार घेणे व नियमित व्यायाम करणे. ज्या गोष्टींनी मणक्याचा त्रास वाढू शकतो त्या टाळल्या पाहिजेत उदाहरणार्थ, वाकून कामे करणे, जड वस्तू उचलणे, बसून काम असल्यास तासाभराने उठून अंग मोकळं करणे, संगणक व इतर बैठ्याकामांमध्ये बैठक योग्य ठेवणे, दुचाकी व इतर वाहने कमीत कमी प्रमाणात व खड्डे, गतिरोधक सांभाळून चालवणे, धूम्रपान, मद्यपानासारखी व्यसने टाळावीत. व्यायामाने आराम पडू शकतो. व्यायामाचे तीन हेतू असतात. सांध्यांच्या हालचालीमध्ये लवचिकपणा व संतुलन सुधारणे, आयसोमेट्रिक व्यायामाने स्नायू बळकट करणे व स्नायूंना ताण देऊन त्यांची लवचिकता वाढवणे साध्य होते. कमरेला व मानेला दिलेले पट्टे हे निव्वळ संरक्षक म्हणून वापरले जातात उपचार म्हणून नव्हे.
वरील सर्व उपचार तोकडे पडल्यास; मात्र शस्त्रक्रिया करावी लागते. त्यात डिस्केक्टमी म्हणजे त्रासदायक चकती काढणे, लॅमिनेक्टमी म्हणजे मज्जातंतू मोकळे करण्यासाठी हाडे कापून दोन मणक्यातील जागा मोठी करणे व स्टॅबिलायझेशन म्हणजे धातूची सळई किंवा हाडाचे रोपण करून दुखरे मणके एकसंध करणे किंवा जोडणे. सुदैवाने, ९० टक्के रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागत नाही. योग्य व पुरेसा व्यायाम व इतर उपायांनी स्पॉन्डिलोसिसपासून दीर्घकाळ वेदनामुक्त आयुष्य जगता येते.
(लेखक चिपळुणात हाडाचे डॉक्टर आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.