महामार्गावरील बंद रस्ते बनले मद्यपींचे अड्डे

महामार्गावरील बंद रस्ते बनले मद्यपींचे अड्डे

Published on

- rat२४p१३.jpg-
P२५N७९६०८
साखरपा : मद्यपींनी टाकलेल्या मद्याच्या बाटल्या, ग्लास.

बंद रस्ते ठरताहेत मद्यपींचे अड्डे
मिऱ्या-कोल्हापूर महामार्ग; प्लास्टिकची ग्लास, काचेच्या बाटल्या रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता २४ : मिऱ्या-कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साखरपा परिसरातील काही भागातील काम पूर्णही झालेले आहे; मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केलेला नाही. त्यामुळे हे रस्ते धिंगाणा घालणाऱ्यांचे ठिकाण बनले आहे. हा रस्ता मद्यपींचा अड्डा बनत चालला असून, ठिकठिकाणी प्लास्टिकची ग्लासं, पाण्याच्या आणि मद्याच्या बाटल्या रस्त्यावर इस्ततः पसरलेल्या पाहायला मिळत आहेत. याला वेळीच आळा घालण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग सध्या आंबाघाटाच्या पायथ्यापर्यंत म्हणजेच मुर्शी गावापर्यंत काही अपवाद वगळता किमान एका बाजूने बांधून पूर्ण झालेला आहे. काही ठिकाणी तर या महामार्गाचे दोन्ही बाजूकडील काम पूर्ण झालेले आहे. असे असले तरीही काही ठिकाणच्या मोऱ्या, नदीवरील पऱ्‍यांवरील छोटे पूल बांधण्याचे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यामुळे महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरीही तेथून वाहतूक सुरू केलेली नाही.
महामार्गावरील हीच ठिकाणे सध्या मद्यपींचे अड्डे बनत आहेत. या महामार्गावरून प्रवास करणारे पर्यटक अशा ठिकाणी थांबून मद्यप्राशन करत असतात. अशा ठिकाणी वाहने थांबवून निर्जन रस्त्यावर बसून धिंगाणा घातला जातो. त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी अशा मद्यपींनी रस्त्यात टाकलेल्या मद्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, खाण्याच्या प्लेट असे महामार्गावर पडल्याचे पाहायला मिळत आहे.

चौकट ः
वेळीच आळा घाला...
बंद रस्त्यावर टोळकी तासन्‌तास बसून दारू ढोसत बसतात. त्यानंतर रस्त्यावर धिंगाणा घालतात. त्यातूनच त्यांच्यात वादावादीसह हाणामारीचे प्रकारही घडतात. त्यातून प्राणघातक हल्ला, खुनासारखे प्रकार घडू शकतात. त्याचबरोबर मद्य ढोसून तर्र... झाल्यानंतर वाहन चालविणाऱ्यांकडून मोठे अपघात घडण्याची भीतीही आहे. याकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com