-नावडीतील चित्रशाळेत शाडूसह लाल मातीपासून मूर्ती
वेध गणेशोत्सवाचे --लोगो
-rat२४p१४.jpg-
P२५N७९६२१
ऋषिकांत शिवलकर
-rat२४p१५.jpg-
२५N७९६२२
नावडी येथील चित्रशाळेत मूर्तीचे रंगकाम सुरू आहे.
-----
नावडीतील चित्रशाळेत शाडूसह लाल मातीपासून मूर्ती
ऋषिकांत शिवलकर यांची ४२ वर्षे मूर्तिकलेची साधना ; विविध रुपात उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २४ ः संगमेश्वरमधील नावडी पोस्ट आळी येथे राहणारे प्रसिद्ध गणेश चित्रकार ऋषिकांत शिवलकर हे आपल्या जीवनात हरहुन्नरी कलाकार, चित्रकार, मूर्तिकार म्हणून गेली अनेक वर्षे ओळखले जातात. वैशिष्ट्य म्हणजे शाडू मातीबरोबरच लाल मातीपासूनचे गणपती येथे पाहावयास मिळतात.
१९७० मध्ये त्यांनी आपल्या पेंटिंगच्या कामाला सुरुवात केली. गावात त्या वेळी हाताच्या बोटावर मोजता येतील, असे दोन ते तीन पेंटर होते. बोर्ड पेंटिंग, वॉलपीस, चार ते पाच फूट उंचीची देवी-देवतांची तसेच साधुसंतांची चित्रे रेखाटन व रंगकला ते बोलता बोलता सहजपणे करत असत. पेंटिंग कलेबरोबरच जोडव्यवसाय म्हणून ११ छोटे गणपती काढून १९८४ मध्ये चित्रशाळेला प्रारंभ केला. पत्नी (कै.) सौ. स्मिता व मोठ्या दोन मुलींची साथ त्यांना त्या काळात उत्तम लाभली. त्यानंतर मुलगा मंदार व तुषार हे देखील वडिलांची कला पाहून पाहून शिकत होते. काही वर्षानंतर रंगकला पाहून व कलाकुसर पाहून गणपतीची संख्या २१० पर्यंत पोहोचली.
सध्या शिक्षकीपेशा सांभाळून चित्रकार मंदार व तुषार हे दोन्ही भाऊ ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे २८० रेखीव गणेशमूर्ती काढतात. एक ते पाच फुटापर्यंतच्या मूर्ती सध्या त्यांच्या चित्रशाळेत आहेत. बालगणेशमूर्ती विविध रूपे शोकेसमध्ये ठेवण्यासाठी बाराही महिने विकल्या जातात. वैशिष्ट्य म्हणजे शाडू मातीबरोबरच लाल मातीपासूनचे गणपती येथे पाहावयास मिळतात.
यावर्षी शिवलकर यांच्या गणेश चित्रशाळेत एक जूनला मातीकामास प्रारंभ झाला व २ जुलैपासून रंगकामाला सुरुवात झाली आहे. सध्या कारखान्यात रंगकामाची लगबग सुरू आहे. रत्नागिरी, फुणगूस, पिरंदवणे, अंत्रवली, करंबेळे, संगमेश्वर पंचक्रोशीतील भक्त येथून गणपती नेतात.
चौकट
कलारत्न म्हणून गौरव
विविध उत्सवाच्यावेळी गावातील नाटकात पांडू हवालदार, दादा कोंडके यांच्यासारख्या भूमिका व रंजक अभिनय ते करत असत. वृद्धापकाळामुळे शिवलकर सध्या घरी विश्रांती घेतात. कलारत्न म्हणून सन्मानचिन्ह देऊन गावातील सामाजिक मंडळांनी २०२१ मध्ये त्यांना सन्मानित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.