मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज
- rat२६p१३.jpg-
P२५N८००९१
दापोली ः आंजर्ले खाडीत उभ्या असलेल्या नौका.
- rat२६p१४.jpg ः
२५N८००९२
बंदरात उभ्या असलेल्या नौकांची डागडुजी करताना खलाशी
- rat२६p१५.jpg
२५N८००९३
ः नौकांवर बर्फ भरण्याचे काम सुरू आहे. (राधेश लिंगायत, सकाळ छायाचित्रसेवा)
----
मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज
शुक्रवारपासून हंगाम सुरू ; हर्णै, दाभोळ, केळशी भागात लगबग
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २६ ः दोन महिन्यांच्या मासेमारी बंदी कालावधीनंतर आता दापोली तालुक्यातील हर्णै, दाभोळ, केळशी आणि पंचक्रोशीतील सुमारे ८००हून अधिक मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. १ ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला सुरुवात होत असल्यामुळे सध्या आंजर्ले खाडीत मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे; मात्र बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आल्यामुळे शासन त्यावर काय निर्णय घेते, याकडे मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.
गेले दोन महिने बंद असलेली मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे हर्णै बंदरासह आसपासच्या मच्छीमार वसाहतीत सध्या होड्यांची डागडुजी, रंगकाम, इंजिन तपासणी, जाळींची विणाई, खाद्य व इंधन साठवणूक, बर्फाची तयारी, खलाशांची जमवाजमव अशा कामांत मच्छीमार व्यग्र आहेत. प्रत्येक होडी समुद्रात उतरवण्यापूर्वी तिची पूर्णपणे तयारी आणि सुरक्षितता पाहणे अत्यंत आवश्यक असते. कोळी समाज धार्मिक परंपरांशी निष्ठावान असल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला श्रावण महिना सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी श्रावण महिन्यातील सप्ताह सुरू झाले आहेत. विशेष पूजाअर्चा, खेमदेवाला प्रार्थना आणि शुभ मुहूर्त ठरवूनच होड्या समुद्रात सोडल्या जातात. समुद्र शांत राहावा, भरपूर मासळी मिळावी आणि कोणतेही अपघात घडू नयेत यासाठी हर्णै, पाजपंढरी येथील मच्छीमार समाजाकडून विधिवत व धार्मिक कार्यक्रम करण्याची तयारीही सुरू झाली आहे.
मागील हंगामात मे महिन्याच्या २० तारखेपासून अचानक आलेल्या पावसाने मच्छी व्यवसायाला फटका बसलेला होता. त्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले होते. मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. सामान्यतः १५ ऑगस्टच्या आसपास मासेमारी हंगाम सुरू होतो; मात्र यंदा पावसाने समाधानकारक लवकर हजेरी लावून नंतर गायब झाला; परंतु कालपासून पावसाने सुरुवात केल्यामुळे यंदाच्या हंगामावर पावसाचे सावट दिसत आहे. हवामान विभागाकडून, अजून ३ दिवस मुसळधार पाऊस राहील, असे जाहीर केल्यामुळे १ ऑगस्टपासून वातावरण पोषक होईल, अशी शक्यता आहे. त्यासाठी तीन दिवस आधी मासेमारीला जाण्यासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत.
----
चौकट १
हवामानाचा अस्थिरपणा
मागील काही वर्षांपासून वातावरण अस्थिर राहिल्यामुळे मच्छीमारांना नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी, मत्स्यव्यवसाय संकटात सापडला आहे. मासेमारीबंदीच्या काळात होणारा खर्च, होडी डागडुजीचे भांडवल आणि घरखर्च चालवताना अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण वाढला आहे.
चौकट २
सरकारकडून मदतीची अपेक्षा
शासनाने जाहीर केलेल्या मासेमारीबंदीचे काटेकोरपणे पालन करूनही मच्छीमारांना कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही. सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी मदत योजना आणते त्याप्रमाणे मच्छीमारांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची गरज आहे. ती लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.
-----
कोट
मासेमारी हंगाम १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. मासेमारी व्यवसायावर येथील लोकांची उपजीविका अवलंबून आहे. यंदाचा हंगाम भरघोस मासळी घेऊन यावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
- अनंत चोगले, मच्छीमार, हर्णै बंदर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.