कर्करोगाच्या नायनाटसाठी ‘आरोग्य’ सतर्क
80136
कर्करोगाच्या नायनाटसाठी यंत्रणा सरसावली
‘आरोग्य’तर्फे बांद्यात शिबिर; जनजागृतीमुळे ३२२ नागरिकांनी घेतला लाभ
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेले मोफत कर्करोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. ३२२ नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेवर निदान व्हावे आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. करतस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या राबविण्यात आले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी तालुका आरोग्य सहाय्यक शंकर परब, तालुका आरोग्य सेवक अरुण गवस, कार्यक्रम सहाय्यक विशाल डोंगळी, पीसीएम विनिता दळवी, नीतिका सावंत आणि सांख्यिकी सहाय्यक ज्योती ठुंबरे यांनी तालुका पातळीवर उत्तम समन्वय साधला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, डॉ. जनाबाई आव्हाड, रोणापाल डॉ. सोनाली पाटील, डॉ. अमित भाग्यवंत, डॉ. आरती देसाई, डॉ. दीपाली वराडकर, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. प्रियांका पाटील-कासार आणि दंत चिकित्सक डॉ. मण्यार यांनी आपली उपस्थिती लावली. शिबिराच्या व्यवस्थापनात आरोग्य सहाय्यक बी. टी. जाधव, आरोग्य निरीक्षक पी. आर. साळगुडे, आरोग्य सहायिका एस. एस. रणशूर, औषध निर्माण अधिकारी आर. म्हाडगुत, कनिष्ठ सहाय्यक दिनेश देसाई, आरोग्य सेवक नरेंद्र बांदवलकर, दिग्विजय जाधव, राजू नाईक, सुरेश कांबळे, सीएचओ तेजस्विनी माजगावकर, सीएचओ अमोल खिल्लारी, वैभव शेजुळ, महेश हिपलकर यांनी विशेष मेहनत घेतली. याशिवाय प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुहास शेळपाडकर, वर्षा बांदेकर, परिचारिका प्रेमा कदम, रश्मी शेणई, दीपा देसाई, शरयू सावंत, स्टाफ नर्स अर्चना गोन्साल्विस, आरोग्य सेविका शांती कदम, गटप्रवर्तक भक्ती मेस्त्री, सफाईगार वासुदेव जाधव, तसेच सर्व आशा स्वयंसेविका, हिंदलॅब कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सांगेली, मळेवाड व निरवडे आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचेही मोलाचे योगदान लाभले.
रोटरी क्लब ऑफ बांदाचे उपाध्यक्ष दिगंबर गायतोंडे, सचिव सुदन केसरकर, उपसरपंच आबा धारगळकर, यशवंत आळवे, बाबा काणेकर, विराज परब, योगेश परुळेकर, रत्नाकर आगलावे, सुनील राऊळ आणि संजय शिरोडकर या पदाधिकाऱ्यांनी शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वयंसेविका म्हणून रितिका माजगावकर, वनिता धुरी, सावली कामत, संजना सावंत आणि रत्नमाला वीर यांनी तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना मदत व मार्गदर्शन केले.
--------
विविध तपासण्या, नागरिकांना आवाहन
या मोफत तपासणी शिबिरात स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग अशा तपासण्या करण्यात आल्या. काही संशयित रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. तपासणीनंतर उपस्थित महिलांना व पुरुषांना कर्करोग प्रतिबंधक उपाय, लक्षणे व योग्य काळजी घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित डॉक्टर व रोटरी क्लब पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी नियमित तपासणी करून घ्यावी, योग्य वेळी उपचार घ्यावेत आणि आरोग्य सजगतेत कायम पुढे राहावे, असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.