मुलांच्या अभ्यासाबाबत सजग राहा

मुलांच्या अभ्यासाबाबत सजग राहा
Published on

80282

मुलांच्या अभ्यासाबाबत सजग राहा

डॉ. ज्योती तोरसकर ः मालवणात सेवांगणतर्फे विद्यार्थी गुणगौरव

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २७ ः मुले गुणवंत, ज्ञानवंत व संस्कारित होण्यासाठी पालकांनी जागरुक राहणे गरजेचे आहे. शालेय अभ्यासासह इतर विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचनही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही वाचन करावे. त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. त्यासाठी सेवांगणच्या वाचनालयाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गडकिल्ले संवर्धन विषयावरील तज्ज्ञ मार्गदर्शिका डॉ. ज्योती तोरसकर यांनी केले.
बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने मालवण येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थी, शिष्यवृत्ती व विविध शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात झाला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सेवांगणचे कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, दीपक भोगटे, मनाली वेंगुर्लेकर, संजय आचरेकर, शिक्षक श्री. बर्वे, श्री. पाटील, मिलिंद कदम, ऋतुजा केळकर, ऐश्वर्य मांजरेकर आदी उपस्थित होते.
खांडाळेकर यांनी पालकांनी सेवांगणच्या इतर शैक्षणिक उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. खोबरेकर यांनी सेवांगणच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. दीपक भोगटे यांनी शिष्यवृत्ती वर्गाची रुपरेषा पालकांना समजून सांगितली. शिष्यवृत्ती परीक्षा ही भावी सर्व स्पर्धा परीक्षांची प्राथमिक परीक्षा आहे. त्यादृष्टीने अभ्यास करावा, असे आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शिका मनाली वेंगुर्लेकर यांनी, पालकांना व मुलांना अभ्यासाचे वेळापत्रक समजून सांगत विद्यार्थ्यांनी वर्गाला नियमित हजर राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. बर्वे व पाटील यांनी सेवांगणच्या उपक्रमांचे कौतुक केले. मिलिंद कदम यांनी सेवांगणने केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती विभागाच्या प्रमुख ज्योती तोरसकर यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल तसेच ऐश्वर्य मांजरेकर यांचा एलएलबी परीक्षा उतीर्ण केल्याबद्दल सत्कार केला. प्रारंभी वैष्णवी आचरेकर, रुचिरा चिंदरकर, सोनाली कोळंबकर यांनी गायलेल्या ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com