पवित्रा, ओवी, आर्या अभिनयात प्रथम

पवित्रा, ओवी, आर्या अभिनयात प्रथम

Published on

80307

पवित्रा, ओवी, आर्या अभिनयात प्रथम

सातार्ड्यातील स्पर्धा; टिळक ग्रंथालयाचा सुवर्णमहोत्सव

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २७ ः सातार्डा टिळक ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुष्प अकरावे अंतर्गत पंचक्रोशी मर्यादित खुली एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेत विविध गटांतून पवित्रा कुडतरकर, ओवी आरोंदेकर, आर्या कवठणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय आयोजित व परशुराम सावळाराम शिरोडकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव उदय शिरोडकर पुरस्कृत पंचक्रोशी मर्यादित एकपात्री अभिनय स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी मुंबई महानगरपालिकेच्या निवृत्त मुख्याध्यापिका स्नेहल मांजरेकर उपस्थित होत्या. सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने आतापर्यंत राबविलेले सर्व उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे उद्‍घाटन कवठणी गावचे सामाजिक कार्यकर्ते, रंगकर्मी सदानंद नाईक यांच्या हस्ते झाले.
व्यासपीठावर ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर, कार्यवाह धनंजय केरकर, सहकार्यवाह ज्ञानदीप राऊळ, सल्लागार नारायण बागकर, गजानन शिरसाट, पंच सदस्या शर्मिला मांजरेकर, सदस्य गोविंद मांजरेकर, पंचायत समिती माजी सदस्या श्रुतिका बागकर, परीक्षक प्रसाद मांजरेकर, रुपेश कवठणकर, मुख्याध्यापक दासू गावित, सातार्डा पोलिसपाटील विनिता मयेकर, सातोसे पोलिसपाटील संदीप सातार्डेकर, उद्योजक संतोष कांबळी आदी उपस्थित होते.
संतोष कांबळी यांनी ग्रंथालयाच्या कार्यक्रमांचे कौतुक केले. सातार्डा हायस्कूल मुख्याध्यापक प्रशांत सावंत, पांडुरंग हळदणकर आदी उपस्थित होते.
-----
स्पर्धेचा निकाल असा
बालगट( तिसरी ते चौथी)-पवित्रा कुडतरकर, लावण्या कुबल, प्रियांश म्हालदार. लहान गट (पाचवी ते सातवी)-ओवी आरोंदेकर, आर्या आरोंदेकर, दिया सातार्डेकर. मोठा गट (आठवी ते दहावी)-आर्या कवठणकर, आर्या वेंगुर्लेकर, पलक कवठणकर. अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी प्रास्ताविक केले. परीक्षक प्रसाद मांजरेकर व रुपेश कवठणकर यांनी काम पाहिले. कार्यवाह धनंजय केरकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com