वजराट शाळेसाठी पुरेसा निधी देणार

वजराट शाळेसाठी पुरेसा निधी देणार

Published on

80317

वजराट शाळेसाठी पुरेसा निधी देणार

मनिष दळवी; भाजपतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः वजराट शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी शाळेसह गावचे नाव उज्वल केले आहे. या शाळेची वाढती प्रगती लक्षात घेता शाळेच्या भौतिक सुविधांसाठी आवश्यक निधी वर्षभरात प्राप्त होईल. शाळेच्या चार वर्गखोल्यांसाठीही निधी प्राप्त करून दिला जाईल. भविष्यात या शाळेचे रंगरूप बदलेल, अशी ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत वजराट शाळा क्रमांक १ चे चार विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय ग्रामीण गुणवत्ता यादीत आले. याबद्दल वजराट भाजप व ग्रामस्थांतर्फे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, गावातील दहावी-बारावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी श्री. दळवी यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब, वजराट गावचे डॉ. अनिकेत वजराटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेखर परब, तंटामुक्ती अध्यक्ष दादा परब, अण्णा वजराटकर, रोटरी क्लब अध्यक्ष आनंद बोवलेकर, इनरव्हील क्लब अध्यक्ष अपर्णा बोवलेकर, उपाध्यक्ष बबन कांदे, आडेली हायस्कूल शिक्षक जाधव, श्री. वजराटकर, श्याम परब, ग्रामपंचायत सदस्य रसिका मेस्त्री, प्रवीण कांदे, उपाध्यक्ष जानवी कांदे, करीश्मा सोनसूरकर, वसंत परब आदी उपस्थित होते.
भाजपचे नितीन चव्हाण, वामन भोसले, नितीन परब, आनंद परब, रवी पालयेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. राज्यस्तरीय ग्रामीण जिल्ह्यात पाचवी, तालुक्यात द्वितीय आलेल्या स्वरधा झेंडे, राज्यस्तरीय ग्रामीण जिल्ह्यात नववा, तालुक्यात तृतीय आलेला नीरज परब, राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक माही घोंगे, पियुषा घोणे तसेच उत्तीर्ण विद्यार्थी चैतन्य सावंत-भोसले, गुरुनाथ पेडणेकर, यश पालयेकर यांचा प्रसन्ना देसाई यांच्यातर्फे दिलेली स्कूल बॅग व इतर शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान केला. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, दहावी व बारावी उत्तीर्ण यांचा वजराट भाजपतर्फे शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान केला. गावातील प्रगतशील शेतकरी शेतकरी संजय केरकर यांच्यासह मान्यवर, शिक्षकांचाही सत्कार केला. शिक्षक तेजस बांदिवडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
--
वाचल्याशिवाय प्रगती नाही!
डॉ. देवधर यांनी, घरात वाचन संस्कृती बंद पडली आहे. वाचल्याशिवाय प्रगती होत नाही. मुलांना श्रमाची सवय लावा. ज्या मुलांना पुढे जायचं आहे त्यांनी सूर्य उगवायचा आधी उठायला शिका. मुलाला काय व्हायचे आहे हे पालकांनी विचारावे. कोणतही काम करताना लाज बाळगू नका, असे मार्गदर्शनही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com