नदीकिनाऱ्यावर वसलेले निरूळमधील सांब मंदिर

नदीकिनाऱ्यावर वसलेले निरूळमधील सांब मंदिर

Published on

श्रावण विशेष------लोगो

80342
80343


नदीकिनाऱ्यावर वसलेले निरूळमधील सांब मंदिर
शतकांची परंपरा ; मंदिराचा परिसर निसर्गरम्य
सुधीर विश्वासरावः सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २७ः रत्नागिरी तालुक्यातील निरूळ गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. या गावातील नदीकिनारी श्री देव सांब हे जागृत देवस्थान आहे. त्याला अनेक शतकांची परंपरा असल्याचे म्हटले जाते. या मंदिरामध्ये श्रावण महिन्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्यामुळे या कालावधीत भक्तांची नहमीच गर्दी पहायला मिळते.
निरूळ येथील या मंदिराची आख्यायिकाही तेवढीच महत्वाची आहे. फार वर्षांपूर्वी एका गुराख्याची गाय मंदिराच्या परिसरात पान्हा सोडत असल्याचे लक्षात आले. ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर तिथे शिवपिंड आढळली. त्यानंतर परिसरामध्ये मंदिर उभारण्यात आले. हे जागृत शिवमंदिर सुमारे सहाशे वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज आहे. या देवस्थानातील गाभारा एका अखंड जांभा दगडांमध्ये असून त्यात शिवपिंडी आहे. त्यामुळे ही शिवपिंडी स्वयंभू म्हणजेच कुणीही स्थापना केलेली नाही, अशी ओळख सांगितली जाते. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर या मंदिरामध्ये पहिल्या सोमवारी मानकऱ्यांच्या हस्ते शिवपिंडीची पूजा केली जाते. त्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने अभिषेक केला जातो. दररोज शिवपिंडीवर अभिषेक केला जातो. हे जागृत देवस्थान असल्यामुळे दर सोमवारी प्रामुख्याने अनेक भाविक या मंदिरामध्ये येऊन शिवपिंडीचे दर्शन घेतात. या मंदिराचा परिसर निसर्गरम्य असल्यामुळे दोन्ही बाजुला डोंगर आहेत. त्यामधून खळखळाट करत जाणारी नदी आहे. श्रावण महिन्यात बरसणाऱ्या पावसामुळे या नदीतील पाण्याचा प्रवाह वेगवान असतो.
दरम्यान, देवस्थानचे मानकरी बने आणि गावकर ठीक यांनी निरूळ हे गाव फार वर्षांपूर्वी वसवले आहे. त्यामुळे या दोन्ही आडनावाची वस्ती या गावांमध्ये मोठ्याप्रमाणात असून त्यांचे सगळे सोयरे नव्याने या गावांमध्ये दाखल झालेले आहेत. याविषयी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश गावित म्हणाले, नोकरी निमित्त येथे आल्यानंतर सांब मंदिरात जाण्याचा योग आला. येथी शिवपिंडीवर अभिषेकही केला. त्यामधून समाधान मिळाले.


चौकट
अशा आहेत परंपरा
निरुळ येथील या सांब मंदिर परिसरात पौर्णिमेला रक्षाबंधन करण्याची पद्धत आहे. निरूळ गावात प्रदोष व् त्रयोदशी दरम्यान श्री देव सांब यांना देवळामध्ये रूपे लावली जातात. त्यादिवशी ग्रामस्थ जागर करतात. रात्रभर ग्रामस्थ नामाचा जयघोष करीत असतात. त्यावेळी लिंगायत गुरव सर्व गावातील ग्रामस्थांना पवती (जानवे) देण्याची पारंपरिक प्रथा आहे. तसेच पावस परिसरामध्ये शिमगोत्सवात प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवतेला रूपे लावली जातात. निरूळ गावात वर्षानुवर्षे तेरसे शिमगा करण्याची पद्धत आहे. याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की गावात देवस्थानचे पवित्र राखावे यासाठी वर्षानुवर्षे या ठिकाणी पालखी घरोघरी फिरण्याची प्रथा नाही. दर्शनासाठी पालखी सानेवर ठेवली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com