शास्त्रीय, सुगम संगीतातून विद्यार्थ्यांची ‘गुरुवंदना’

शास्त्रीय, सुगम संगीतातून विद्यार्थ्यांची ‘गुरुवंदना’

Published on

80482

शास्त्रीय, सुगम संगीतातून विद्यार्थ्यांची ‘गुरुवंदना’

कणकवली आदर्श विद्यालय; सुमधुर गायन, वादनामुळे श्रोते मंत्रमुग्ध

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २९ ः शहरातील आदर्श संगीत विद्यालयातर्फे ‘गुरुवंदना’ हा कार्यक्रम गुरुवर्य वामनराव काराणे सभागृहात झाला. दिवसभरात तीन सत्रांमध्ये विभागलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शास्त्रीय आणि सुगम गायन-वादन सादरीकरणांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
पहिल्या सत्राचे उद्‍घाटन संगीततज्ज्ञ बाळ नाडकर्णी, प्रा. हरिभाऊ भिसे, पखवाज विशारद संदीप मेस्त्री, विद्यालयाचे संचालक संदीप पेंडूरकर, संचालिका तेजस्विता पेंडूरकर, केशव पेंडूरकर यांच्या उपस्थितीत झाले. या सत्रात श्रीवल्लभ साटम, अभिज्ञ देशपांडे, जिजा गावडे, यशराज पवार, चैतन्य गुरव, राधा कोरगावकर, आरोह पेंडूरकर, इशिता लाड, आद्या कारंडे, आरोही मेस्त्री, राधा प्रभूझाट्ये, शिवम सावंत, तन्मय जाधव, देवांश गवस, विघ्नेश खेमनाळकर, मिहीर पाटकर, स्नेहा मुसळे, विवान पाटील, युक्ता मेस्त्री, सिमरन मुजुमदार, स्वरा राणे, प्रेम हर्णे, दुर्वांक पावसकर, कैवल्य सावंत, आराध्य वाळके, जयेश राणे, पूर्वी करंबेळकर, मैत्रेयी हिर्लेकर, मेहा मेस्त्री, भार्गवी जाधव, श्रीनिवास कृपाळ, चेतन भोगटे यांनी सहभाग घेतला.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी कथ्थक विशारद गौरी कामत यांचा सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे आणि प्रियाली कोदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्रात शरण्या राणे, हिमानी काणेकर, पद्मा नागवेकर, सुनेजा साटम, वर्षा अभ्यंकर, आराध्य वाळके, ममता राणे, नभा गोवळकर, याज्ञवी कोदे, इरा नागवेकर, मनीष सोनुर्लेकर, प्रसन्न कांदळकर, संस्कार ठाकूर, रुद्र गोसावी, ओंकार परब, श्रीनिवास कृपाळ, स्वानंद काणेकर, तनय नातू, विराज राणे, सारा मोरजकर, शर्वरी असगेकर, श्रीनंद जोशी, प्राजक्ता ठाकूरदेसाई, साक्षी सुतार, कीर्ती गुरव, मुक्ता साईल, आर्या भाटवडेकर, स्वरांगी करंबेळकर, ऋचा वाळके, अद्वैत गवस, गौरेश कांबळे, श्रावणी कोकाटे, पारुल शिरोडकर, अंजली बापर्डेकर यांनी सुंदर गायन व वादन सादर केले.
---
तिसऱ्या सत्रात तहसीलदारांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस आणि ॲड. संदीप राणे प्रमुख उपस्थित होते. या सत्रात आरोही मेस्त्री, काव्या गवंडळकर, स्वानंद जोशी, वैदेही पावसकर, जीवळ साटम, सलोनी मेस्त्री, अद्वैत रेवडेकर, स्वाती जोशी, स्मिता आवटे, संपदा रेवडेकर, ध्रुव सावंत, मीनल केळुसकर, मृणाल गावकर, नेहा देशपांडे, कुणाल गवंडळकर, स्वरांगी गोगटे, विदिता जोशी, मंथन चव्हाण यांनी गायन-वादन सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com