रोजगाराभिमुख शिक्षण म्हणजे परमकर्तव्य

रोजगाराभिमुख शिक्षण म्हणजे परमकर्तव्य

Published on

swt2825.jpg
80561
कट्टाः येथे बहुवीध कौशल्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या हस्ते पार पडला.

रोजगाराभिमुख शिक्षण
म्हणजे परमकर्तव्य
अजयराज वराडकरः कट्टा हायस्कूलमध्ये कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २९ः शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली प्रचंड स्पर्धा लक्षात घेऊन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने कट्टा परिसर व दशक्रोशीतील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबर व्यावसायिक कौशल्य असणारे शिक्षण देऊन स्वावलंबी बनवू असा निर्धार बाळगला होता. हा निर्धार आज साध्य होताना दिसत असून रोजगाराभिमुख शिक्षणातून नव्या दिशा देण्याचे कार्य हे परमकर्तव्य असून योगात्मा डॉ. काकासाहेब यांच्या प्रेरणेची ही शक्ती असून असेच कार्य आपण संस्था व सहकाऱ्यांच्या मदतीने करू, असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी केले.
कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये बहुविध कौशल्य अभ्यासक्रम प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, खजिनदार रविंद्रनाथ पावसकर, संचालक स्वाती वराडकर, महेश वाईरकर, श्रध्दा नाईक, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट उपस्थित होते. यावेळी सुनील नाईक यांनी भविष्यातील नोकरीचा पर्याय म्हणून रोजगाराच्या संधीचे महत्व विषद करताना संस्थेने आर्थिक जोखीम उचलून केलेल्या प्रयत्नाविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी ध्रुवी महेश भाट (प्रथम), मयुरी दिनेश पेडणेकर, त्रिशा ऋषिकेश नाईक, हर्षल प्रकाश कानुरकर, कोमल अनिल गावडे (द्वितीय), वैष्णवी महादेव चव्हाण (तृतीय) यांच्यासह ७० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला. या निमित्ताने विभागामार्फत प्रदर्शनाचेही आयोजन केले होते. सूत्रसंचालन किशन हडलगेकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com