जाहीरात लेख
swt2824.txt
बातमी क्र.24
(बातमी कृपया वाचावी)
टीपः swt2827.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - संदीप गावडे
टीपः swt2828.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - मुंबई ः भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा देताना संदीप गावडे.
सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्त्व
लीड
सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्यांबरोबरच त्यांची कामे तत्परतेने मार्गी लावणारे आणि युवावर्गाच्या गळ्यातील ताईत म्हणून आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील फणसवडे गावाचे भाजपचे युवा नेतृत्व म्हणून संदीप गावडे यांच्याकडे पाहिले जाते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे खास विश्वासू सहकारी म्हणून ते परिचित आहेत. अशा या हुनहुन्नरी युवा नेतृत्वाचा आज वाढदिवस साजरा होत आहे यानिमित्त..
रुपेश हिराप
---------------
फणसवडेसारख्या अतिदुर्गम भागात जन्मलेले संदीप गावडे हे उच्चशिक्षित असून सह्याद्री पट्ट्याचा विकास व ग्रामस्थांना अपेक्षित असलेले काम करण्यासाठी त्यांची धडपड गेली अनेक वर्ष सुरू आहे. त्यांची धडपड आणि जनतेपरी असलेली आपुलकी लक्षात घेता आज सह्याद्री पट्ट्यामध्ये एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मुळात उद्योग, व्यवसायानिमित्त मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचा राहिलेला प्रवासही थक्क करणारा आहे. त्यांच्या या प्रवासामध्ये अनेक उलथापालथ झाल्या. मात्र, त्यांनी भाजप व समाजसेवेचा वसा कधीच सोडलेला नाही. उद्योग, व्यवसाय करताना समाजसेवा आणि दानशूरपणाचा हात त्यांनी कायमच पुढे ठेवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने वडिलांसारखे छत्र नेहमीच त्यांना लाभले. यासाठी श्री. गावडे यांचे पक्षावरील असलेले प्रेम, कामाची सचोटी, प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा राहीला आहे. श्री. चव्हाण यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी विश्वासाने पार पाडण्यासोबत प्रत्येक काम ते तडीस नेतात.
श्री. गावडे यांनी आपला राजकीय प्रवास सावंतवाडी पंचायत समिती सदस्य म्हणून सुरू केला. ज्या भागात आपण जन्म घेतला त्या भागातील जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या पदाला पुरेपूर न्याय दिला. सह्याद्री पट्ट्यातील प्रत्येक गावात त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहिली. श्री. चव्हाण यांच्याकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी असताना केसरी-फणसवडे ह्या आंबोली घाटाला पर्यायी ठरणाऱ्या रस्त्याला श्री. गावडे यांनी मंजुरी मिळवली. यासाठी त्यांनी चव्हाण यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला होता. या कामाच्या रूपाने गेली कित्येक वर्षाची मागणी पूर्ण झाली. यासोबतच गेळे गावातील कबुलायतदार गावकर जमीन वाटपाच्या प्रश्नावरही ग्रामस्थांच्या बाजूने राहत श्री. गावडे यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. हा प्रश्न जवळपास सुटल्यास जमा असून जनतेसोबत शेवटपर्यंत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी नेहमीच कामे केली आहेत. विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे वाटप म्हणा किंवा ओपन जिम, रस्ता, पाणी, वीज आदी मूलभूत प्रश्नांवरही त्यांनी जनतेला न्याय दिला आहे. त्यांच्या एकूणच कामाच्या कार्यपद्धतीवर जनतेतून नेहमीच समाधान राहिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मला सदैव आशीर्वाद दिलेत, त्यामुळे जनतेचे प्रश्न कामे मार्गी लावू शकलो आणि भविष्यातही जनतेची कामे मार्गी लावणार आहे, असे ते अतिशय अभिमानाने सांगतात.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.