लांजा विकास आराखड्याच्या स्थगितीसाठी प्रयत्न
-rat२८p४०.jpg-
२५N८०५८०
लांजा ः विकास आराखड्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थित संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर आणि पदाधिकारी.
------------
लांजा विकास आराखड्याच्या स्थगितीसाठी प्रयत्न
बचाव समितीचा निर्धार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २८ ः लांजा शहराच्या कृती आराखड्यावरून वर्षभर लांजा नगरपंचायत आणि लांजा-कुवे बचाव संघर्ष समितीमध्ये घूमजाव सुरू आहे. प्रशासन लक्ष देत नसल्याने राज्यमंत्री नीतेश राणे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लांजा-कुवेच्या कृती आराखड्याला स्थगिती मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. कृती आराखड्याला स्थगिती न मिळाल्यास लढा कायम राहणार असल्याचा निर्धार लांजा-कुवे संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत केला.
लांजा-कुवे संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर, दिलीप मुजावर, मोहन तोडकरी, नगरसेवक लहू कांबळे, नितीन शेट्ये आदींनी पत्रकार परिषद घेतली. लांजेकर म्हणाले, लांजा नगरपंचायतीने शहरविकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्याबाबत अनेक नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विकास आराखड्यामध्ये असंख्य त्रुटी आहेत. या संदर्भात आमदार किरण सामंत, खासदार नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत निवेदन देऊन विकास आराखड्याला तातडीने स्थगिती मिळावी, अशी मागणी केली आहे. २७ जुलैला रत्नागिरी येथे मत्स्य व बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टी समजून घेतल्या आहेत.
हा आराखडा चुकीच्या पद्धतीने बनवलेला आहे. त्यामुळे विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नीतेश राणे यांनी दिले आहे. या आराखड्याला जोपर्यंत स्थगिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा निर्णय सर्व नागरिकांनी घेतला आहे. शहरातील मंदिरे, आणि प्रार्थनास्थळे यांच्या जागा बाधित होत आहेत. व्यावसायिक भाग ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आले आहेत. परिसरासह शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या विरोधात लांजा नगरपंचायतीकडे सुमारे १५०० नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.