-संदिप भेकत यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षकरत्न पुरस्कार

-संदिप भेकत यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षकरत्न पुरस्कार

Published on

-rat२८p२.jpg-
P२५N८०४४८
दापोली ः उत्कृष्ट शिक्षकरत्न पुरस्कार संदीप भेकत यांना देताना जनकल्याण सामाजिक संस्थेचे सदस्य सुरेश पाटील.
----
संदीप भेकत यांना राज्यस्तरीय पुरस्कार
गावतळे, ता. २८ ः दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा विरसई शाळेत कार्यरत पदवीधर शिक्षक संदीप भेकत यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षकरत्न पुरस्कार मिळाला. त्याबद्दल २५ जुलै रोजी दापोली येथे जनकल्याण सामाजिक संस्थेचे सदस्य सुरेश पाटील, अखिल शिक्षक संघटनेचे विजय फंड, भालचंद्र घुले, किशोर धुमाळ, केंद्रप्रमुख शशिकांत बैकर, वाळंज आदींच्या हस्ते सपत्नीक सन्मानित करण्यात आले. नासा, इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी पहिल्याच वर्षी शिरसोली गावची धनश्री जाधव हिची तर विरसई मराठी शाळेतही सलग तीन वर्षे मुलांची नासा, इस्रो अभ्यासदौऱ्यासह शिष्यवृत्ती आणि नवोदय विद्यालयासाठीही विद्यार्थी निवड होत असून, रंगोत्सव सेलिब्रेशन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दरवर्षी विरसई शाळेचे अनेक विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरतात. याचे श्रेय फक्त भेकत यांना जाते.

Marathi News Esakal
www.esakal.com