-ग्राममंदिरासह वीरगळ सतिशिलांची स्वच्छता
- rat२९p२६.jpg -
P२५N८०७३८
तुळशी: मंदिर परिसर स्वच्छ करताना प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक.
- rat२९p२८.jpg-
२५N८०७४०
ऐतिहासिक खुणा सांगणाऱ्या वीरगळ, सतीशिळा.
---
ग्राममंदिरासह वीरगळ सतीशिळांची स्वच्छता
तुळशी न्यू इंग्लिश स्कूलचे अभियान; ऐतिहासिक महत्त्व
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २९ ः श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवाराचे औचित्य साधून तुळशी न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तुळशी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवले. या परिसरातील विरगळ सतीशिळांचीही स्वच्छता केली.
श्रावण महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन प्रशालेने राबवलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले आहे. तुळशी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर आणि तेथील परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. वर्षभर अनेक तिथींना देवळात पूजाअर्चा, भजन आणि पूजन कार्यक्रम होत असतात. गावाच्या माथ्यावर वसलेले मंदिर लक्ष वेधून घेते. मंदिर परिसरात आढळून येणाऱ्या वीरगळ, सतीशिळा या गावाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आहेत. त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने मंदिर परिसरातील जुन्या वीरगळची विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षकांनी माहिती दिली. श्रावण महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व विषद करताना नैसर्गिक घडामोडी सांगून निसर्गात होत जाणारे बदल वैज्ञानिक दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या वेळी श्रमदान करून मंदिर परिसर स्वच्छ केला. या अभियानात प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा नटे, शिक्षक शिवाजी सोनवणे, टी. एस. खंदारे, सुरेश कोतवाल, कैलास धाडवे, कर्मचारी संदेश पारधी यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.