विद्यार्थी सहायता केंद्राच्या स्थापनेसाठी ४ महाविद्यालयांशी करार
-rat२९p४१.jpg-
२५N८०८२४
रत्नागिरी : विद्यार्थी सहाय्यता केंद्राच्या स्थापनेसाठी ४ महाविद्यालयांशी कराराप्रसंगी उपस्थित उपकुलसचिव डॉ. लीलाधर बन्सोड व जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य.
---
विद्यार्थी सहाय्यता केंद्रासाठी
चार महाविद्यालयांशी करार
मुंबई विद्यापीठ ; समस्या सोडवून अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया होणार सुलभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये आणि दूरस्थ व ऑनलाइन शिक्षणकेंद्राची (सीडीओई) सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुलभ व सर्व समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठाने जिल्ह्यातील महाविद्यालयांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामध्ये दापोली अर्बन बँक वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय (दापोली), ज्ञानदीप विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (खेड), एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (रत्नागिरी) आणि डीबीजे महाविद्यालय (चिपळूण) यांचा समावेश आहे, अशी माहिती उपकुलसचिव डॉ. लीलाधर बन्सोड यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षणकेंद्राची (सीडीओई, पूर्वीचे आयडॉल) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दूरस्थ व ऑनलाइन शिक्षणकेंद्राच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रता धारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. शिकण्याची सुलभता, परवडणारे शिक्षणशुल्क, युजीसी (डीईबी) आणि एआयसीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम हे सीडीओईची बलस्थाने आहेत. विद्यार्थी सहाय्यता केंद्राच्या (एलएससी) मदतीने विद्यार्थ्यांना सीडीओईच्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुलभता, समुपदेशन, परिचय सत्रे, गृहपाठ, प्रात्यक्षिके आणि प्रकल्प कार्य हाताळणे, सत्र/सत्रांती परीक्षा घेणे, ऑनस्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये साहाय्य प्रदान करणे यांसह शैक्षणिक कागदपत्रे हाताळणे आणि विद्यार्थ्यांना गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रे उपलब्ध या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातील. विशेष म्हणजे सीडीओईमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या दुहेरी पदवीसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सीडीओईमार्फत चालवण्यात येणाऱ्या एमएमएस आणि एमसीए या अभ्यासक्रमांचे प्रवेश एन्ट्रन्स परीक्षेद्वारे केले जात असून, या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षेसाठी https://forms.epravesh.com/MumbaiUniversity/ या संकेतस्थळावर ३१ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ३ ऑगस्ट रोजी ऑनलाइन प्रवेश परीक्षा होणार आहे.
चौकट
सीडीओईचे विभागीय केंद्र
ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण औपचारिक शिक्षणपद्धतीतून पूर्ण करता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना विद्यापिठामार्फत चालवण्यात येत असलेल्या विविध अभ्यासक्रमांची दालने खुली करून दिली जात आहेत. नजीकच्या काळात पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.