वाकवली जिल्हा परिषद शाळेचा राष्ट्रीय गौरव

वाकवली जिल्हा परिषद शाळेचा राष्ट्रीय गौरव

Published on

वाकवली जिल्हा परिषद शाळेचा राष्ट्रीय गौरव
‘पीएम श्री शाळा’ योजना ; ऑनलाइन समारंभ, देशातील सर्वोत्तम शाळा म्हणून नोंद
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३० ः तालुक्यातील वाकवली शाळा क्र. १ येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचा समावेश केंद्र सरकारच्या ‘पीएम श्री शाळा’ योजनेत देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये झाला आहे. या गौरवाचा ऑनलाइन समारंभ आज पार पडला आणि त्यात शाळेला औपचारिक मान्यता प्रदान करण्यात आली.
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे प्रत्यक्ष समारंभ होत असताना वाकवली शाळेत ऑनलाइन थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार, शिक्षण व कौशल्य विकासमंत्री जयंत चौधरी, खासदार पियुष गोयल, आमदार योगेश सागर आदी मान्यवरांनी ‘पीएम श्री शाळा’ म्हणून घोषित झालेल्या देशभरातील शाळांचा गौरव केला. महाराष्ट्रातून निवड झालेल्या शाळांमध्ये वाकवली शाळा अग्रस्थानी ठरली. या वेळी नीलेश शेठ, सरपंच प्रणाली धुमाळ, उपसरपंच राजेंद्र तांबे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, शालेय समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व सर्व आजी-माजी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ या ऑनलाइन कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

चौकट
शाळेची वैशिष्ट्ये
१८९६ ला ब्रिटिशकाळात स्थापन झालेली ही शाळा आता डिजिटल क्लासरूम, इंटरनेट, सोलर पॅनल, ग्रंथालय, सीसीटीव्ही, योग शिबिरे, आरोग्य उपक्रम, आर्थिक साक्षरता मोहिमा यांसारख्या आधुनिक शैक्षणिक तत्त्वांवर आधारित कार्यरत आहे. ३९ विविध निकषांवर मूल्यांकन झाले. वाकवली शाळेने या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवून कोकणातील ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे.
----
कोट
आमच्या शाळेला मिळालेला हा सन्मान संपूर्ण गावाचा आहे. आमचा शिक्षणावर असलेला विश्वास आणि शिक्षकांचे परिश्रम आज फळाला आले. वाकवलीच्या शाळेचे हे यश संपूर्ण कोकणासाठी प्रेरणादायी आहे.
- दुर्गेश जाधव, अध्यक्ष, शालेय समिती

कोट
ही केवळ शाळेची नव्हे तर संपूर्ण गावाची कामगिरी आहे. आमचे शिक्षक, पालक, शालेय समिती आणि ग्रामस्थ सगळेच शाळेच्या प्रत्येक उपक्रमात खांद्याला खांदा लावून सहभागी होतात. आजच्या स्पर्धेच्या युगात व्यवहारज्ञान, तंत्रज्ञानाची ओळख आणि आत्मविश्वास देण्यासाठीच आमचा प्रयत्न असतो.
-जावेद शेख, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com