श्री गणेशांची कहाणी!
संतांचे संगती -------लोगो
(२४ जुलै टुडे ३)
आपला देह पंचभौतिक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांची सृष्टी आणि शरीर यांचे रहस्य समजून घेण्यासाठी साठ वर्षे दिली आहेत. जर श्री सद्गुरूकृपेने यांचा अनुभव आला तरच ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल. ही अशी एक कहाणी आहे की, ज्यात उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको, हे सांगितले नाही. कारण, देवस्वरूप झाल्यानंतर असे सांगायची आवश्यकताच भासत नाही.
- rat३०p६.jpg-
P२५N८०९७१
- धनंजय चितळे
----
श्री गणेशांची कहाणी!
‘ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी, निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा माही, चौथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचे पीठ कांडावं. १८ लाडू करावेत, सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य, असा गणराज मनी ध्यायिजे, पाविजे. चिंतीले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्य सिद्धी करीजे. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण (संप्रुण)’
जेमतेम दोन-दोन शब्दांचे एक-एक वाक्य त्यामध्ये मळे, तळे, देवळे, रावळेसारखी आलेली यमके. त्यामुळे खूप मजा यायची. या कहाणीची शिकवण काय आहे तर, भगवान श्री मंगलमूर्ती गणेशांची मानसपूजा करण्याचा विचार ही कहाणी रूजवते. ‘श्री गणेश मनी ध्यायिजे’ ही ओळ केव्हा मनाचा गणेश मनी वसावा, हे वाक्य मानसपूजा या श्रेष्ठ उपासनेकडे अंगुली निर्देश करते, असे वाटते. बाह्य किंवा लौकिक पूजा करताना अनेक गोष्टी लागतात. मानसपूजेत काहीच लागत नाही. सर्व गोष्टी मनोमन कल्पायच्या आणि मनानेच अर्पण करायच्या असतात. त्यासाठी आपल्या उपास्यदेवतेचे ध्यान आपल्या मिटल्या डोळ्यांपुढे यायला हवे. त्यासाठी तसा सराव केला पाहिजे म्हणूनच श्रावण महिन्यातील शुद्ध चतुर्थीला हे गणेश मानसपूजा व्रत सुरू करावे आणि माघ महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला व्रताचे उद्यापन करावे. श्रोतेहो, माघी चतुर्थीला श्री गणेशांच्या विनायक अवताराचा जन्म होतो त्यामुळे अनेक ठिकाणी या दिवशी श्री गणेश जयंती साजरी केली जाते, हे आपल्याला ज्ञात आहेच. मंगलमूर्ती श्री गणेश आपल्या हृदयात प्रकट होण्यासाठी रोज श्री गणेशांचे ध्यान करणे आवश्यक आहे, असे ध्यान किमान सहा महिने केले तरच पुढील प्रगती होईल. याची आपल्या पूर्वजांना नक्की कल्पना होती म्हणूनच त्यांनी श्रावण चतुर्थीला प्रारंभ करून सहा महिने व्रत करा, असे सांगितले. सांगतेला अठरा लाडू करावेत, असे का म्हटले असेल? तर नऊच्या पाढ्यातील सर्व अंक पाहिले तर त्यांच्यातील अंकांची बेरीज नऊच येते. उदा., १८ यातील १+८=९ होतात किंवा ६३ मधील ६+३=९ होतात म्हणूनच नऊ या संख्येला परब्रह्माचा अंक असे म्हणतात आणि आठला मायेचा अंक म्हणतात. ओंकारस्वरूप मंगलमूर्ती श्रीगणेश यांचे आत्मरूपात दर्शन होणे, याचे निदर्शक म्हणूनच या अठरा संख्येकडे पाहिले पाहिजे. श्रोतेहो, आपल्या भारतीय कालगणनेप्रमाणे ६० संवत्सरांचे एक चक्र आहे. उदा., आत्ता विश्वावसू संवत्सर सुरू आहे.
श्रावणातील अन्य कहाण्या देवभक्तीबरोबरच उत्तम आचरणाचा उपदेश करतात. खुलभर दुधाची कहाणी वाचा, त्या आजीबाईंचे विचार किती ठाम असतील आणि सर्वांना तृप्त करून सर्वेषाम् अविरोधेन या भावनेने तिने आपल्याजवळील थोडेसे दूध अर्पण केले तेही किती मोठे फळ देऊन गेले! हा श्रद्धाभाव आपल्यात आहे का? याचेच आत्मपरीक्षण करायला हवे. एका पदात म्हटले आहे, लोग कहते हैं भगवान खाते नहीं
शबरी की, तरह तुम खिलाते नहीं।
लोग कहते हैं भगवान आते नहीं
द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं।
या कथांमधील द्रौपदी, शबरी यांच्याप्रमाणेच खुलभर दुधाची कहाणीतील त्या आजीचा भावही दृढ आहे. आपण सर्वांनी त्या कहाण्या नुसत्या ऐकायच्या नाहीत तर ऐकून ऐकायच्या आहेत.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.