कारगिल विजय दिन सावंतवाडीत उत्साहात

कारगिल विजय दिन सावंतवाडीत उत्साहात

Published on

कारगिल विजय दिन
सावंतवाडीत उत्साहात
सावंतवाडी ः (कै.) जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी या संस्थेत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य ठाकूर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते राजेश कापडणीस (माजी सैनिक आणि आताचे शिल्पनिदेशक जोडारी) यांनी कारगिल युद्ध तसेच स्वत:चा आर्मीमधला अनुभव व इतिहासात होऊन गेलेल्या राजांचा गौरवशाली इतिहास सांगितला. कार्यक्रमास गटनिर्देशक सुचिता नाईक, संतोष तेली, ज्येष्ठ निर्देशक दाभोलकर आदी उपस्थित होते. श्री. तांडेल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री. मनोहर यांनी समारोप केला.
....................
दैवज्ञ समाजातर्फे
रविवारी गुणगौरव
कुडाळ ः दैवज्ञ समाज व दैवज्ञ महिला मंडळ कुडाळतर्फे तालुक्यातील ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी (ता. ३) सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित केला आहे. हा कार्यक्रम येथील दैवज्ञ समाज भवनात होणार आहे. समाजातील दहावी, बारावी स्पर्धा परीक्षा, पदवी, इतर परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क व नावनोंदणी अधिक माहितीसाठी अवधूत ओटवणेकर, मानसी ओटवणेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
---
जिल्हा डाक विभागाचा
शनिवारी ‘टाईम डाऊन’
सिंधुदुर्गनगरी ः डाक विभाग अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि भविष्यातील जलद सेवा देण्यासाठी ए.पी.टी. अ‍ॅपची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व उपडाकघरांमध्ये तसेच शाखा डाकघरामध्ये सोमवारपासून (ता. ४) या ए.पी.टी. अ‍ॅप्लिकेशनच्या सुधारित प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. त्यासाठी शनिवारी (ता. २) ‘टाईम डाऊन’ ठेवला आहे. त्या दिवशी कोणतेही पोस्टल व्यवहार पोस्ट ऑफिसमध्ये होणार नाहीत, याची सर्व डाक विभागाच्या ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा डाक अधीक्षक कार्यालयाकडून केले आहे.
...................
आरोस येथे शनिवारी
अभंग गायन स्पर्धा
सावंतवाडी ः जय हनुमान भजन मंडळ, आरोस बाजार आयोजित आरोस येथे हनुमान मंदिरात शनिवारी (ता. २) अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक २००० रुपये, द्वितीय पारितोषिक १००० रुपये, तृतीय पारितोषिक ५०० अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्या २० स्पर्धकांना संधी देण्यात येईल. इच्छुक स्पर्धकांनी ललित नाईक व प्रज्योत मालवणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
....................
मेढा काळबादेवीचा
मंगळवारी जत्रोत्सव
मालवण ः मालवण मेढा येथील आई काळबादेवी मंदिराचा श्रावण महिन्यातील ५ ऑगस्टला वार्षिक जत्रोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त दुपारी ३.३० वाजता संगीत भजने सादर होणार आहेत. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com