जबाबदारीमधून यशाचा मार्ग सापडेल
81006
जबाबदारीमधून यशाचा मार्ग सापडेल
वंदना नागरगोजेः तळेरे महाडिक विद्यालयात करिअर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३० : ‘आपल्या यश-अपयशाला आपणच जबाबदार असतो. तेवढी समज आपल्याला तरुणपणात येत असते. विद्यार्थी ही स्वतःच त्याच्या यशाचा मार्ग रचतो,’ असे प्रतिपादन प्रख्यात करिअर मार्गदर्शक वंदना नागरगोजे यांनी केले. त्या येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयात आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या.
महाडिक विद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम झाला. श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर समिती, ओझरम-तीर्थवाडी यांच्यातर्फे विद्यालयातील नववी ते बारावीच्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना करिअरबद्दल सखोल माहिती देण्यात आली. यावेळी मुंबई येथील प्रख्यात करिअर मार्गदर्शिका वंदना नागरगोजे, गोपीनाथ नागरगोजे, जितेंद्र राणे, विठ्ठल-रुखुमाई मंदिर समिती सदस्य बाबू राणे, सौ. मदभावे, नीलेश सोरप, प्रा. अविनाश मांजरेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर मार्गदर्शनामध्ये येणाऱ्या समस्यांचे निराकरण वंदना नागरगोजे यांनी केले. ‘नागरगोजे यांच्याकडील सखोल ज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी होतोय, हे आमचे भाग्यच आहे,’ असे प्रतिपादन प्रा. मांजरेकर यांनी केले.
यावेळी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या क्षेत्रात संधी आहेत, याचे सखोल मार्गदर्शन श्रीमती नागरगोजे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन हे प्रश्नोत्तरांच्या चर्चेदरम्यान करण्यात आले. त्यामुळे मुलांमध्ये असणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे उलगडली. त्यांना आत्मिक समाधानासह आत्मविश्वास जागा करण्याचे काम या मार्गदर्शनामुळे झाले. प्रा. सचिन शेटये यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.