मंडणगड-टुडे पान १ साठी, संक्षिप्त पट्टा
कलगीतुरा मंडळाच्या
अध्यक्षपदी टेंबे
मंडणगडः कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कलामंडळ, रायगड-रत्नागिरी मंडळाची नूतन कार्यकारिणी निवड महाड येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात झाली. तीन वर्षांसाठी कार्यकारिणी निवड करण्यात आली असून, रामभाऊ टेंबे यांची अध्यक्षपदी व अंकुश जाधव यांची सचिवपदी सर्वानुमते पुन्हा एकदा निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी अशीः उपाध्यक्ष शंकर तुरडे, कृष्णा शिंदे, कार्याध्यक्ष प्रल्हाद शिरशिवकर, सहसचिव वामन बैकर, खजिनदार सहदेव उत्तेकर, संचालक सदस्य किसन बाटे, नथुराम पाष्टे, पांडुरंग पवार, विश्वास रेणोसे, रामचंद्र म्हात्रे, सुनील शिगवण, रवींद्र उमासरे, एकनाथ मांढरे, रामदास वारीक, मनोहर पारदुले, अरुण नाकती व विद्यानंद अधिकारी.
------
लैंगिक तस्करीवर
जनजागृती कार्यक्रम
रत्नागिरीः जिल्ह्यातील सेवा पुरवठादार व असुरक्षित गटांसाठी लैंगिक तस्करी या सामाजिक विषयावर जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात जनजागृती कार्यक्रम झाला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ‘एआरझेड’ संस्थेच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर, माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश सयोनारा टेलेस लाड, ‘एआरझेड’ संस्थापक-संचालक अरुण पांडे उपस्थित होते. कार्यक्रमात विविध सेवाप्रदाते, असुरक्षित गटांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. लैंगिक तस्करीच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर उपाययोजना, मदतकेंद्रांची भूमिका, मानसिक आरोग्य व पुनर्वसनाविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
----------
रामराजे महाविद्यालयात
उद्या रानभाज्यांचे प्रदर्शन
दापोलीः रामराजे महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. कोकणामध्ये आढळणाऱ्या भारंगी, टाकळा, कुरडू, करटोली, चिचार्डी, दार, मायाळू, तेरी, अळू, कोवळा बांबू, दिंडा, कुडा, आंबुशी, पाथरी, शेवगा, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, खापरफुटी, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, आंबाडी, सुरण, उंबर आदी भाज्यांपासून बनवलेल्या पाककृतींचा समावेश असणार आहे. कार्यक्रमाला रत्नागिरी येथील प्रगतशील युवा शेतकरी आणि जॅकफ्रुट किंग मिथिलेश देसाई प्रमुख पाहुणे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.