सरकारी कर्मचारी आंदोलनात शिक्षक समिती होणार सहभागी

सरकारी कर्मचारी आंदोलनात शिक्षक समिती होणार सहभागी

Published on

81031
सातारा : सोनगाव फाटा, सप्तपदी मंगल कार्यालय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा पार पडली. यावेळी उपस्थित मान्यवर.

सरकारी कर्मचारी आंदोलनात शिक्षक समिती होणार सहभागी
राजन कोरगावकर : साताऱ्यातील राज्य कार्यकारिणी सभेमध्ये निर्णय
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३० : राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या झेंड्याखाली सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय सातारा येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्‍या सभेत घेण्यात आला, अशी माहिती संघटनेचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा सातारा सोनगाव फाटा, सप्तपदी मंगल कार्यालय येथे झाली. सप्टेंबरमध्ये राज्य मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा ठराव कार्यकारिणी सभेमध्ये घेण्यात आला. संघटना याबाबत मार्गदर्शक सूचना देणार आहे. १५ मार्च २०२४ ची जाचक संच मान्यता रद्द करावी. संच मान्यता ३१ जुलैला न करता ३० सप्टेंबरप्रमाणेच करावी. आधार कार्ड आधारित संच मान्यता नको असून, पटसंख्येने झालेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे संच मान्यता करावी आणि त्यानुसार बदल्या व्हाव्यात. ''बीएलओ''चे काम प्रत्यक्ष निवडणूक काम वगळून आहे. त्यामुळे या कामासाठी शिक्षकांची होणारी नेमणूक थांबवावी. निकृष्ट पोषण आहार आणि शिक्षकांच्या समस्या वाढविणाऱ्या पोषण आहाराचे नवीन धोरण, पदवीधर वेतन श्रेणीतील त्रुटी, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, केंद्रप्रमुख पद भरती याबाबत निघालेली अधिसूचना आणि कोर्टामध्ये संच मान्यता तसेच बदल्यांसंदर्भात चालू असलेल्या केसेस अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली. शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेऊनच नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात यावे, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
पदवीधर वेतनश्रेणीचा प्रश्न अभ्यासपूर्वक खुल्लर समितीसमोर शिक्षक समितीने मांडला. त्यामुळेच वेतन त्रुटी दूर झाली. वित्त विभागाचा आदेश निघाला; मात्र ‘शालेय शिक्षण’चा आदेश न निघाल्याने काही जिल्हे त्रुटी दूर करण्यास तयार होत नसल्यामुळे त्याबाबतचे निवेदन ‘शालेय शिक्षण’ला तत्काळ देऊन प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही राहील. बीएलओच्‍या कामाबाबत स्पष्ट ‘जीआर’ काढण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला जाईल. जानेवारी २५ ते जुलै २५ पर्यंत विविध ९२ प्रकारचा पत्रव्यवहार शिक्षक समितीने केला असून, त्याचा पाठपुरावा चालू आहे, असेही यावेळी राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी स्पष्ट केले.
यावेळी राजन सावंत, प्रमोद तौडकर, सुरेश पवार, लीलाधर ठाकरे, सुधाकर सावंत, सुनील वाघ, दिलीप महाडिक, नामदेव जांभवडेकर, सचिन मदने, संतोष पावणे, विजय येलवे, विशाल कणसे, जयश्री कदम, तुकाराम पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेला विजय कोंबे, उदय शिंदे, विलास कंटेकुरे, आनंदा कांदळकर, राजन सावंत, सयाजी पाटील, नंदूची होळकर, माळवतकर पाटील, सुरेश पाटील, किशोर पाटील, सतीश सांगळे, वर्षाताई केनवडे, सुधाकर सावंत, दादा जांभवडेकर, सचिन मदने, अर्जुन पाटील, उमेश देसाई, श्रीकांत देवरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com