
१२ (नाना शंकरशेठ पुरवणीसाठी लेख)
rat३०p१.jpg-
२५N८०९४१
नाना शंकरशेठ
rat३०p२.jpg-
२५N८०९४२
नाना शंकरशेठ
---
हेड ------ जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ स्मृतिदिन विशेष
आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबईत सुरू करणारे, महिलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू करणारे, अनेक शिक्षणसंस्थांची स्थापना करणारे दानशूर जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ हे युगपुरुष होते. हिंदुस्थानातील एक अग्रणी समाजसुधारक होते. मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेठ टर्मिनस असं नाव देण्याचा ठराव विद्यमान महाराष्ट्र शासनाने विद्यमान केंद्र सरकारकडे शिफारस करून पाठवला आहे, तो ३१ जुलै रोजी नानांच्या पुण्यस्मरण दिवशी अंमलात यावा. जगन्नाथ शंकरशेठ रेल्वेस्थानक असं मुंबई सेंट्रल या स्थानकाचे नामकरण करून जनतेच्या भावनांचा आदर करावा.
- विजय पेडणेकर, रत्नागिरी
---
विकासाची दूरदृष्टी असणारे दानशूर व्यक्तिमत्त्व
सव्वाशे वर्षांपूर्वी रेल्वेची स्थापना ज्या दूरदृष्टी असलेल्या जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी केली. त्यांना मात्र हे सरकार आणि भारतीय जनतासुद्धा विसरली काय, असा प्रश्न निर्माण होतो. १६ एप्रिल १८५२ रोजी आशिया खंडातील पहिला रेल्वेमार्ग आपल्या हिंदुस्थानात मुंबई येथील बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली ती हिंदुस्थानच्या विकासाची सुरुवातच होती कारण, केवळ रेल्वेमार्ग हा प्रवासी वाहतुकीसाठी पर्याय नव्हता तर त्यामुळे भविष्यातील उद्योगधंदे, आर्थिक विकास, पर्यटन आणि देशाचे रक्षण करण्यासाठी सैनिकी बळ तातडीने इथून तिथे नेण्यासाठी वाहतुकीची प्राथमिकता असणे आवश्यक आहे, हे ओळखूनच रेल्वेची आशिया खंडातील ही सुरुवात मुंबईमध्ये नानांनी केली. मुंबईही त्यामुळेच हळूहळू आज उद्योगधंद्यांचे जाळं असलेली आर्थिक उद्योगनगरी म्हणून जगामध्ये प्रसिद्ध पावली आहे.
नानांनी शिक्षणक्षेत्रामध्ये विविध प्रकारचे शिक्षण हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना कसं अवगत होईल, याचाही विचार करून ग्रँड मेडिकल कॉलेज के. इ. एम. कॉलेज, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, इंडियन एशियाटिक सोसायटी अशा विविध शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. मुंबई युनिव्हर्सिटीची स्थापना नानांनी केली. आज केवळ मुंबईमधीलच विद्यार्थी या शैक्षणिक सेवांचा लाभ घेतात, असं नाही तर भारताच्या विविध भागातील अनेक विद्यार्थी मुंबईमध्ये येऊन विविध प्रकारचे शिक्षण घेत आहेत.
नानांनी त्यांच्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन रेल्वेखात्याचं ऑफिस गिरगावमधील घरामध्ये सुरू करण्यास मदत केली. बोरीबंदर रेल्वेस्थानकाच्या निर्मितीसाठी स्वमालकीची जागाही दान केली. नाना हे सर्वार्थाने दानशूर म्हणूनच ओळखले जातात. त्यांनी विविध संस्थांची निर्मिती करण्यामागे भारतातील जनतेचा उत्कर्ष डोळ्यासमोर ठेवून कार्य सुरू केलं. मुंबई शहराचा विकास करत असताना आपल्या दूरदृष्टीचा प्रभाव त्यांनी प्रत्येक विकासकामांमध्ये दाखवून दिला आहे. मुंबई शहराला आजपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्या दोन तलावांमधून केली जाते, त्या दोनही तलावांचं बांधकाम नानांनी स्वखर्चाने करून दिले आहे. नाना केवळ आपल्याच धर्माचा विचार करत नव्हते. त्यांची उठबस ही भारतामधील गव्हर्नर, इंग्रजी अधिकारी यांच्याबरोबर होती. त्यांच्याशी बोलण्याकरिता इंग्रजी भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं होतं आणि ते मिळवण्यासाठी इंग्लिश शिकण्यासाठी खास शिक्षकांची नेमणूकही करून घेतली होती.
शिक्षणाचे महत्त्व किती आहे, हे ओळखून नानांनी आशियातील पहिली मुलींची शाळा १० ऑक्टोबर १८४८ रोजी आपल्या वाड्यात मुंबईला सुरू केली. याची नोंद अनेक मान्यवरांनी अनेक ठिकाणी केली आहे. केवळ आपल्या घरातील मुलींना सुरुवातीला या शाळेमध्ये पाठवून त्यांनी पुरोगामी विचार आणि महिलांच्या शिक्षणासाठी पावले उचलली आहेत. त्यांनी अशा प्रकारे सात शाळा मुंबई इलाख्यात सुरू केल्या. या संस्थांचे प्रेरणास्थान आणि प्रोत्साहन नानांचं होतं.
नानांनी स्वतःच्या उत्पन्नातील त्या वेळचे रुपये २५ हजार स्त्री शिक्षणासाठी देणगी म्हणून दिले आहेत. याची नोंदही मराठी विश्वकोश खंड सहामध्ये आढळून येते. थोर विचारवंत, अभ्यासकांनी या गोष्टींचा विचार करून स्त्री शिक्षणाचे अग्रदूत नाना शंकरशेठ यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आजही स्त्रीशिक्षणाबाबत नानांचं नाव घेताना राज्यकर्तेही थोडे आकसतात, हे मनाला पटणार नाही. नानांनी अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या देणग्या दिल्या आणि विकासही साधायला सुरुवात केली.
राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील सुप्रसिद्ध कनकादित्याचे मंदिर त्या वेळी फार मोठ्या प्रमाणात बांधलेले नव्हते; परंतु नानांच्या वडिलांनी त्या कनकादित्याला केलेल्या नवसामधून नानांचा जन्म झाला, हे मनात धरून नानांनी स्वखर्चाने कनकादित्य मंदिराचा सभामंडप अतिशय देखण्या स्वरूपात बांधून दिला. त्यांनी स्वखर्चाने आणि दान करून दिल्याची नोंद त्या ठिकाणी आहे. नानांचा जन्म मुरबाड (जि. ठाणे) झाला असला तरी त्यांनी केवळ आणि केवळ मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा विकास डोळ्यासमोर ठेवला नाही. मागासल्या समाजाला पुढे आणण्यासाठी ती समाजसुधारकाची भूमिकाही अतिशय संयमाने पार पाडत असत.
पुण्यामध्ये स्थानिक कॉलेज आणि पाठशाळेचे विलीनीकरण करून नानांच्या पुढाकाराने डेक्कन कॉलेजची निर्मिती केली. नानांच्या हस्तक्षेपामुळे संस्कृतप्रेमी नानांनी संस्कृत हा विषय ऐच्छिक करून सर्व माध्यमिक शाळांतून ठेवण्याचा ठराव केला. नानांच्या या संस्कृतप्रेमामुळेच मुंबई विद्यापीठाने जगन्नाथ शंकरशेठ नावानं संस्कृत शिष्यवृत्ती ठेवली. ती फार मानाची समजली जात असल्याने आजही ती विद्यार्थीप्रिय आहे. नानांच्या प्रयत्नामुळे भारतात मुंबई विद्यापीठासह तीन विद्यापीठांची उभारणी झाली. अखेरपर्यंत नाना मुंबई विद्यापिठाचे सिनेटर होते. शिवडी येथे सुरू केलेलं बालसुधारगृह, एलफिन्स्टन कॉलेज, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स याचबरोबर भायखळ्याचे सध्याचे जिजामाता उद्यान, मुंबई म्युझियम, अनेक दवाखाने, धर्मशाळा इत्यादी स्थापन करण्याचं श्रेय नानांना जाते. ग्रँड मेडिकल कॉलेज, डेंटल हॉस्पिटल म्हणजे नायर हॉस्पिटल अशा अनेक संस्था नानांनी स्थापन केल्या. ४४ वर्षांची नानांची समाजसेवा इतकी विलक्षण आहे की, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्या वेळी टाऊनहॉलमध्ये ठीक जाहीर सभा बोलावण्यात आली होती. त्यामध्ये ब्रिटिश आणि हिंदुस्थानातील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी झाले होते. त्या वेळी दादाभाई नौरोजींनी नानांची मुक्तकंठाने स्तुती केली. आजपर्यंतच्या इतिहासात कोणाचाही झाला नसेल असा हा पूर्णाकृती पुतळा अतिशय उच्च दर्जाच्या संगमरवरी दगडापासून इटलीमधून करून खास बोटीने मुंबईमध्ये आणण्यात आला. आजही तो टाऊनहॉलमध्ये पाहू शकतो. नानांच्या हयातीमध्येच त्यांचा संगमरवरी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे ठरवले.
नाना खऱ्या अर्थाने समर्पित जीवन जगले. आपल्या स्वकष्टाच्या पैशाचे जनतेसाठी योगदान देऊन अनेक एकर जमीन नानांनी मुंबईमध्ये जनतेसाठी दान केली. अशा या थोर युगपुरुषाचं ३१ जुलै १८६५ रोजी अल्पशा आजाराने देहावसान झालं. मुंबईमध्ये आजपर्यंत नानांची अंत्ययात्रा ही अजरामर आहे. एवढी प्रचंड मोठी अंत्ययात्रा आजपर्यंत कुणाचीही निघाली नव्हती. टाईम्स किंवा ब्रिटनमधील दैनिकांनी नानांच्या मृत्यूपश्चात मृत्युलेख अग्रलेख रकानेच्या रकाने भरून त्यांच्या सामाजिक कार्याचा आदरपूर्वक गौरव केला. सर्वधर्मीय रयतेसाठी नानांनी कार्य केलं. सर्व देशवासीयांचे हित सर्वांगीण उन्नती हा त्यांचा ध्यास होता. नाना हे आम जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. त्यांचं स्मारक अतिशय मोठ्या प्रमाणावर होणं, ही काळाची गरज आहे.
रेल्वेचे उद्घाटन ही या देशातील एक क्रांतिकारी घटना म्हटली पाहिजे. नानांनी ती केली. स्वतःच्या हिमतीवर आणि म्हणूनच त्या वेळच्या बोरीबंदर स्थानकाला म्हणजेच व्हिटी स्टेशनला नामांतर करून नानांचं नाव देण्याचं नाना शंकरशेठ स्थानक नाव देण्याचं निश्चित झालं होतं; परंतु व्होट बँकेवर डोळा ठेवून पक्षीय स्वार्थासाठी त्या वेळच्या केंद्र सरकारने जनतेच्या भावनांचा अनादर केला.
----
चौकट
महाराष्ट्रामध्ये सतीची चाल बंद होण्यासाठी १८२९ मध्ये त्यांनी राजाराम मोहन रॉय यांच्याप्रमाणेच मुंबईमधून इंग्लंडच्या पार्लमेंटकडे अर्ज करून सतीबंदीची सुरुवात केली होती. त्यालाही फार मोठ्या प्रमाणावर यश आलं. अशा या नानांचे योगदान केवळ महाराष्ट्र किंवा केवळ मुंबई अशा पुरतं मर्यादित न राहता त्याची नोंद संपूर्ण भारतवर्षामध्ये घेतली जाणं आवश्यक आहे. नानांची प्रत्येक रेल्वेस्थानकावर तैलचित्रं लावली जावीत आणि त्यातूनच भारतीय रेल्वेचे जनक खरे कोण, हे जनतेसमोर जाणं आवश्यक आहे. दरवर्षी १६ एप्रिलला रेल्वेचा वाढदिवस रेल्वेचे प्रवासी साजरा करतात. त्या दिवशी ज्या विभूतीनं ही रेल्वे सुरू केली त्यांचं स्मरणही करणे आणि त्यांना श्रद्धांजली वाहणे ही नैतिक जबाबदारी आहे, याचे भान त्यांनी ठेवलं पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.