पेठवडगाव: राज पाटील गॅंग मधील आठ जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
पेठवडगावची पाटील टोळी
कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
गंभीर गुन्ह्यांची नोंद ः वर्षासाठी अंमलबजावणी
पेठवडगाव, ता. ३० : येथील राज पाटील टोळीतील आठ जणांना वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले. कारवाई झालेल्यांची नावे अशी प्रभाकर गोविंद कुरणे (वय ५०, रा. मौजे तासगाव), विकास भगवान अवघडे (४०, रा. भादोले), राजवर्धन बाबासो पाटील (३६), शुभम संजय शिंदे (१९), प्रसाद उर्फ लाल्या संतोष सुतार (२८), ओंकार सुरेश लोहार (२६), शुभम दत्तात्रय यादव (२५), दीपक संपत भोसले (३१, सर्व रा. पेठवडगाव).
शहरात दोन गटात मे २०२४ ला मारामारीची घटना घडली होती. याप्रकरणी पाटील, माने गटाने एकमेकांविरोधात गुन्हे नोंद केले होते. दोन्ही गटांत वारंवार धुसफूस सुरू होती. उपविभागीय पोलिस अधिकारी गडहिंग्लज यांनी म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा लागू केल्या होत्या. याची अंमलबजावणी पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या काळात कार्यवाही करण्यात आली. टोळ्यांच्या गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी ही कारवाई केली.