रसाळगडावर जनसुविधा केंद्र ठप्प !

रसाळगडावर जनसुविधा केंद्र ठप्प !

Published on

rat३१p२६.jpg-
P२५N८१२०४
खेड -रसाळगडावरील ठप्प असलेले जनसुविधा केंद्र.

रसाळगडावरील जनसुविधा केंद्र ठप्प
पर्यटकांची गैरसोय ; १५ ऑगस्ट रोजी उपोषण
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३१ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रसाळगड किल्ल्यावर पर्यटक आणि शिवभक्तांची मोठी वर्दळ असते. झोलाई वाघजाई देवीचे जागृत मंदिर असलेल्या या गडावर स्वच्छतागृहाच्या अभावामुळे मोठ्या असुविधांचा सामना भाविकांना करावा लागतो. महिलांची विशेषतः अत्यंत आबाळ होत असल्याने गेली अनेक वर्षे स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांनी जनसुविधा केंद्राची मागणी केली होती.
शासनाने या मागणीची दखल घेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात १० राज्य संरक्षित स्मारकांवर जनसुविधा केंद्रासाठी परवानगी दिली. यामध्ये रसाळगडाचाही समावेश होता. सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन या संस्थेमार्फत जनसुविधा केंद्राचे काम सुरुवातीला नियमानुसार नोटीस लावून सुरू करण्यात आले. जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर दापोली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ते काम थांबवले आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला. रसाळगड किल्ला त्यांच्या भूप्रेषण क्र. १०९ मध्ये येतो, त्यामुळे कोणतेही काम करण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक आहे, असा वनविभागाचा दावा आहे. दुसरीकडे हा गड राज्य संरक्षित स्मारक असून, त्यांच्या देखरेखीखाली काम सुरू असल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले. या विरोधाभासामुळे दोन्ही विभागांत समन्वयाचा अभाव आहे. या सगळ्यामुळे संतप्त झालेल्या शिवभक्त आणि ग्रामस्थांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच या संघटनेने १५ ऑगस्ट रोजी खेड तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com