दुतर्फा नाले नसल्याने रस्त्याची दुरवस्था
- rat३१p११.jpg:
P२५N८११५६
सावर्डे ः वालावलकर रुग्णालय प्रवेशद्वारासमोर नाले नसल्याने पावसाचे पाणी सखल भागात साचते.
(अशोक कदम ः सकाळ छायाचित्रसेवा)
---
दुतर्फा नाले नसल्याने रस्त्याची दुरवस्था
डेरवण येथील स्थिती; शैक्षणिक संस्था, रुग्णालयांमुळे गर्दी
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ३१ : झपाट्याने विकसित होत असलेल्या गोवा-मुंबई महामागावरील सावर्डे ग्रामपंचायत हद्दीतील डेरवणफाटा ते डेरवण रुग्णालयादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नाले नसल्यामुळे रस्त्याची दुरवस्था होत आहे. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक पाहिजे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचते. त्याचा त्रास विद्यार्थी, रुग्णालयाकडे जाणारे कर्मचारी तसेच पादचाऱ्यांबरोबर वाहनचालकांनाही होत आहे. रस्त्याचीही हानी होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डेपासून दुर्गवाडीकडे जाणारा हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता खूपच वर्दळीचा बनलेला आहे. कै. गोविंदराव निकम सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या शाळा, वालावलकर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण शिवसृष्टी यामुळे येथील रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाले नसल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, ते पाणी रस्त्यावरून सखल भागाकडे वाहत जाते. त्या पाण्यावरून वाहने गेली की, बाजूला पाण्याचे फवारे उडतात. त्यात पादचारी चिखलयुक्त पाण्याने चिंब होतात. अशावेळी अंगावर पाणी उडल्यामुळे पादचारी व वाहनचालकांचे वादाचे प्रसंग उद्भवतात.
कुडप फाटा, स्वप्नील निवास संकुल क्र. ३ व वरदायिनी हॉटेलसमोरील सखल भागात पावसाचे पाणी साचते. त्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते. या पाण्यातूनच शालेय विद्यार्थी, रुग्णालयाचे कर्मचारी, रुग्ण आदींना जीव मुठीत घेऊन मार्ग काढत जावे लागते. पावसाचे पाणी या खड्ड्यात साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. अनेकदा अपघातही घडतात विशेषकरून पादचारी लोकांना व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. दरम्यान, ठिकठिकाणी गतिरोधक बसवण्याची गरज आहे. एखादा गंभीर अपघात होईपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याची भूमिका घेत आहे.
----
कोट
सार्वजनिक बांधकाम विभागाने डिसेंबर महिन्यात रस्त्यावरील खड्डे व बाजूपट्ट्या भरल्या आहेत. रस्ता वाहतुकीस योग्य आहे; मात्र नाले नसल्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची धूप होऊन खड्डे पडत आहेत.
- सुरेश कुंभार, नागरिक सावर्डे
---
कोट
सकाळी ९ वाजता या रस्त्यावर रहदारी अधिक असते. रस्ताही अरुंद आहे. पावसाळ्यात पायी जात असताना खड्ड्यातील पाणी चुकवत शाळेत पोहोचावे लागते. प्रशासनाने रस्ता रुंद करून नाले काढण्याची गरज आहे.
- आयुष जाधव, विद्यार्थी
---
कोट
रस्ता उंच-सखल आहे. त्यातच दोन्ही बाजूला गटारे नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात वाहने चालवणे जिकिरीचे होते. लहान मुले शाळेत जात असतात. त्यामुळे वाहन चालवताना अंगावर पाणी उडणार नाही, याची सावधगिरी बाळगावी लागते.
- राकेश जाधव, रिक्षाचालक, येगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.