संक्षिप्त-मालवण येथे रविवारी
''उत्तरचंद्राची कोजागरी''

संक्षिप्त-मालवण येथे रविवारी ''उत्तरचंद्राची कोजागरी''

Published on

मालवण येथे रविवारी
‘उत्तरचंद्राची कोजागरी’
मालवण, ता. ३१ ः बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने रविवारी (ता. ३) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे ‘उत्तरचंद्राची कोजागरी’ अभिवाचन अनुभव हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता लेखक वैशाली पंडित यांची आहे. या अभिवाचन अनुभव कार्यक्रमामध्ये आजोबा-संजय शिंदे, सहकलाकार-डॉ. सुमेधा नाईक, आजी-वैशाली पंडित, सूत्रधार-अक्षय सातार्डेकर, तालवाद्य-वैभव मांजरेकर हे असणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेंगुर्ले येथे मंगळवारी
बागायतदारांची सभा
वेंगुर्ले, ता. ३१ ः सिंधुदुर्ग जिल्हा आंबा काजू बागायतदार शेतकरी संघटनेची महत्त्वाची सभा मंगळवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता येथील फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या
अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत फळ पीक योजनेसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी व आंबा बागायतदारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा होणार आहे. या सभेस आंबा बागायतदार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, सभासद व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे सचिव अॅड. प्रकाश बोवलेकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय गणित स्पर्धेत
अदिती सावंतचे यश
दोडामार्ग, ता. ३१ ः जुलैमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणित व जनरल नॉलेज स्पर्धा-२०२५ मध्ये येथील इंग्लिश बेस्ट स्कूलची विद्यार्थिनी अदिती सावंत हिला अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती कमी व्हावी, बेसिक क्रिया जलदगतीने सोडविण्यासाठी व सुप्तगुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी जिव्हाळा उद्योग समूह, अहमदनगर या संस्थेतर्फे स्पर्धेचे आयोजन केले जाते. अदितीने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तिला संस्थेतर्फे विजेती ट्रॉफी, मेडल व सन्मानपत्र देण्यात आले. या राष्ट्रीय स्पर्धेत विविध जिल्ह्यांतून विद्यार्थी सहभागी झाले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. आदितीला या स्पर्धेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे व पालकांचे मार्गदर्शन लाभले.

शिष्यवृत्ती परीक्षेत
रेडी प्रशालेचे यश
सावंतवाडी, ता. ३१ ः रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थिनींनी पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. पूर्व माध्यमिक परीक्षेत गौतमी डुबळे हिने ५९.४५ टक्के व काव्यांजली राणे हिने ५६.७५ टक्के गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारणमध्ये यश संपादन केले. संस्थेच्या डेप्युटी सी.ई.ओ. डॉ. अनघा राऊत, मुख्य सल्लागार एम. पी. मेस्त्री, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता विल्सन, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.
मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापकांचेही संस्थेमार्फत अभिनंदन करण्यात आले. या यशाबद्दल गौतमी व काव्यांजली यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com