प्रमोद शिंदे विभागप्रमुख, संतोष जाधव उपविभागप्रमुख
- rat३१p३१.jpg-
२५N८१२१४
संगमेश्वर - नवनियुक्त पदाधिकारी प्रमोद शिंदे, संतोष जाधव यांचा सत्कार करताना ठाकरे सेनेचे नेते.
शिंदे विभागप्रमुख, जाधव उपविभागप्रमुख
दत्ता कदम ः फुणगूस गणात ठाकरे शिवसेनेची सभा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १ ः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आंबेडखुर्द येथे आयोजित सभेत फुणगूस गणातील प्रमोद शिंदे यांची विभागप्रमुखपदी तर संतोष जाधव यांची उपविभागप्रमुखपदी निवड झाल्याचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी जाहीर केले. आंबेडखुर्द (ता. संगमेश्वर) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित सभेला फुणगूस पंचायत समिती गणातील शिवसैनिकांची प्रचंड गर्दी होती. या प्रसंगी फुणगूस गणातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर केल्या. जिल्हाप्रमुख कदम यांच्या आदेशानुसार उपजिल्हाप्रमुख व जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा संघटक संतोष थेराडे तसेच उपतालुकाप्रमुख प्रकाश घाणेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सभेला नावडी विभागप्रमुख वैभव मुरकर, नावडी उपविभाग संघटक सिद्धेश सावंत, साखळकोंडचे माजी सरपंच संतोष मुंडेकर, रवींद्र मुंडेकर, कसबा विभागप्रमुख चंद्रकांत फणसे, उपविभागप्रमुख रमेश मेस्त्री, उपविभाग संघटक विठ्ठल गुरव, आंबेडखुर्द शाखाप्रमुख सीताराम फणसे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.