-स्वराज आईनकरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
- rat३१p२३.jpg-
25N81191
स्वराज आईनकर
राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी
स्वराज आईनकरची निवड
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३१ ः ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मंडणगड तालुक्यातील स्वराज आईनकर यांची निवड झाली आहे. राज्य तायक्वांदो असोसिएशन आयोजित ३७वी राज्य वरिष्ठ क्लोरूगी आणि ११वी पुमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत स्वराज आईनकर याने ५४ किलो वजनीगटात सुवर्णपदक तर ठाणे येथील जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तो महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ओडिसा येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर क्रीडांगणावर होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सध्या तो वॉरियर तायक्वांदो अॅकॅडमी सानपाडा येथे प्रशिक्षण घेत आहे. मंगेश आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली तो राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत होता. या यशामध्ये मंडणगड तालुका तायक्वांदो असोसिएशन यांचेही मोलाचे योगदान आहे.