
- rat३१p२०.jpg-
P२५N८११६५
लांजा ः शिवार आंबेरे येथील पेजे महाविद्यालयाचे विद्यार्थी माचाळ येथे क्षेत्रीय भेटीचा आनंद घेताना.
‘पेजे’च्या विद्यार्थ्यांची
माचाळ धरणाला भेट
पावस, ता. १ ः शिवार आंबेरे येथील लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट माचाळ व खोरनिनको धरण येथे झाली. माचाळ हे निसर्गरम्य ठिकाण असून, वातावरणातील बदल व थंड हवेमुळे उलट फिरणारा धबधबा याचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. खोरनिनको धरण व मानवनिर्मित धबधबा याची पाहणी केली. ही क्षेत्रभेट आयोजित करण्यासाठी प्रा. अमोल गिरकर, नेचर क्लब विभागप्रमुख प्रा. अनुष्का लिंगायत, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. कल्पना मेस्त्री, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. अमित पवार यांनी सुद्धा आपला सहभाग दर्शवला.