रत्नागिरी-किल्ले भरतगडावर स्वच्छता मोहीम

रत्नागिरी-किल्ले भरतगडावर स्वच्छता मोहीम

Published on

- rat३१p५.jpg-
२५N८११६७
राजा शिवछत्रपती परिवार संस्था.

रत्नागिरीतील संस्थेकडून किल्ले भरतगडावर स्वच्छता
राजा शिवछत्रपती परिवारचा पुढाकार ; प्रत्येक महिन्यात राबवणार मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : रत्नागिरीतील राजा शिवछत्रपती परिवारातर्फे सिंधुदुर्गमधील ऐतिहासिक भरतगड किल्ल्यावर स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदुर्ग येथून ३५ मावळे आणि रणरागिणी सहभागी झाल्या होत्या. राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात ३१ जिल्ह्यांत कार्यरत आहे. किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक महिन्याला अशी मोहीम आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
राजा शिवछत्रपती परिवारातर्फे २०१६ पासून गडसंवर्धनाचे कार्य सुरू केले. त्यासाठी रत्नागिरीतील किल्ले जयगडची निवड केली. जयगड येथील किल्ल्यावरील पहिल्या मोहिमेत गडपरिसर आणि समोरील भागातील कचरा संकलन, तणनियंत्रण, पायऱ्यांवरील व तटबंदीवरील झाडेझुडपे हटवणे, बालेकिल्ल्यांमधील प्रवेशद्वार ते मंदिर परिसर स्वच्छ केला होता. किल्ल्यावर स्वच्छता ठेवून पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर आणि गावातील नागरिकांना शिवकार्याबद्दल जागरूक करण्यासाठी शिवगर्जना फेरीही काढली होती. या पुढील मोहिमेत सहभाग वाढवण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले भरतगडावर स्वच्छतामोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत ग्रामपंचायत, पोलिस ठाणे, इतिहासप्रेमी तसेच भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विशेष सहकार्य लाभले. आचरा रहिवासी अमित गांवकर यांच्याकडून या मोहिमेत सहभागी लोकांसाठी चहा, नाष्टा व जेवण साहित्य मोफत पुरवण्यात आले.
स्वच्छतामोहिमेच्या अखेरीस किल्ल्याच्या इतिहासाविषयी चर्चा होऊन पुढील काळात सातत्याने भरतगडावर दुर्गसंवर्धनाचे कार्य राबवण्याचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवक, स्थानिक प्रशासन व किल्लेप्रेमींचे राजा शिवछत्रपती परिवार, रत्नागिरीतर्फे विशेष आभार मानण्यात आले तसेच राजा शिवछत्रपती परिवार आणि ट्रेकगुरू संस्था यांच्या सहकार्याने यापुढेही प्रत्येक महिन्यात स्वच्छतामोहीम घेण्यात येणार आहे.

चौकट
ऑगस्टमध्ये पुन्हा मोहीम
पुढील महिन्यात राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि शिवस्मारके स्वच्छतामोहिमेला बळ द्या. त्यासाठी राजा शिवछत्रपती परिवारातर्फे प्रवीण परब, अरुण मोरे यांच्याशी संपर्क साधा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com