सवंगडी ग्रुपच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा
rat३१p२८.jpg-
२५N८१२०६
राजापूर ः राजापूर हायस्कूलच्या इयत्ता १०वी शताब्दी वर्ष बॅच सवंगडी ग्रुपच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला.
सवंगडी ग्रुपच्या गुणवंत पाल्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ : राजापूर हायस्कूलच्या इयत्ता दहावी शताब्दी वर्ष (१९९०-९१) बॅच सवंगडी ग्रुपच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा आणि स्नेहमेळावा नुकताच मनोहरदास म्युनिसिपल स्कूल फोर्ट मुंबई येथे किशोर बाईत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी दहावी, बारावी, पदवी आणि स्पर्धात्मक परीक्षांत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वयाची पन्नाशी पार केलेल्या सर्व सवंगड्यांचा केक कापून एकत्र वाढदिवस साजरा करण्यात आला.
सवंगडी ग्रुपच्यावतीने विविध क्षेत्रामध्ये सुयश संपादन केलेल्या २१ विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, चषक व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. या वेळी महेश कदम, संतोष लोळगे, प्रकाश दळवी, सज्जाद मापारी, संतोष हातणकर यांनी मनोगते व्यक्त केली. वर्षा पाटील हिने चलचित्राद्वारे मुलांच्या प्रगतीचे सादरीकरण केले. यश पोवार याने श्री विठ्ठलावरील गीत गाऊन सर्वांची मनं जिंकली तर प्रकाश बाईत याने मैत्रीचे बंध उलगडणारी मित्र वणव्यामध्ये ही कविता सादर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.