डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार घ्या
- rat३१p३६.jpg-
P२५N८१२३७
लांजा ः लांजा महाविद्यालयाच्या ग्रंथ संकलन उपक्रमांतर्गत जमा झालेली सुमारे २०० पुस्तके न्यू इंग्लिश स्कूल जावडेच्या ग्रंथालयासाठी भेट म्हणून देताना प्रा. राहुल मराठे, डॉ. सुहास देसाई आणि विद्यार्थी.
---
डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार घ्या
डॉ. सुहास देसाई ः जावडे शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १ ः मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक साधनांच्या अतिरिक्त वापरामुळे डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. डोळ्यांची नियमित तपासणी करून डोळ्यांना जास्त ताण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे व डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सकस आहारदेखील घेतला पाहिजे, असे प्रतिपादन नेत्रचिकित्सा साहाय्यक डॉ. सुहास देसाई यांनी जावडे येथे केले.
श्रीराम वंजारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा या प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिरावेळी ते बोलत होते. या वेळी लांजा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राहुल मराठे, हेरिटेज संस्थेचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कांबळे, जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश कांबळे, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक गजानन पांचाळ तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. या शिबिरात हेरिटेज प्रयोगभूमीतील तीनही शाळांतील सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली. तसेच लांजा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राबवण्यात आलेल्या ग्रंथसंकलन उपक्रमांतर्गत जमा झालेली सुमारे २०० पुस्तके न्यू इंग्लिश स्कूल जावडे व माध्यमिक आश्रमशाळा जावडेच्या ग्रंथालयासाठी भेट म्हणून देण्यात आली.