कनेडी दशक्रोशीतील वीज पुरवठा सुरळीत करा

कनेडी दशक्रोशीतील वीज पुरवठा सुरळीत करा

Published on

81330


कनेडी दशक्रोशीतील वीज पुरवठा सुरळीत करा

स्थानिकांची मागणी; सांगवे महावितरण कार्यालयात धडक

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३१ ः कनेडी दशक्रोशीतील गावांमधील कमी दाबाचा वीज पुरवठा, वीज बिलांत येणारी तफावत, लाईनमनकडून वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून न घेणे आदी समस्या चतुर्थीपूर्वी दूर कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा कनेडी दशक्रोशीतील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी आज महावितरणला दिला. तर ५ ऑगस्ट पर्यंत बहुतांश समस्या मार्गी लावू, अशी ग्‍वाही कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी दिली.
कनेडी दशक्रोशीतील वीज ग्राहकांनी जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या नेतृत्‍वाखाली सांगवे येथील महावितरणच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी वीज ग्राहकांनी त्‍यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. तसेच गणेश चतुर्थीच्या सणापूर्वी वीज वाहिनीच्या सर्व समस्या दूर करून गणेशोत्सवात सुरळीत विद्युत पुरवठा करण्याची मागणी केली.
यावेळी नागरिकांनी नादुरूस्त मीटर बदलताना स्मार्ट वीज मिटरची सक्‍ती करू नये. वीज बिलातील तफावत दूर करावी. जुलै महिन्यात आलेली वाढीव बिले कमी करावीत. लाईनमन वीज ग्राहकांचे फोन उचलत नाहीत. त्‍यांना समज द्यावी किंवा त्‍यांनी अन्यत्र बदली करावी. सांगवे बांदवाडी येथे ट्रान्सफार्मर बसविला. मात्र, ग्राहकांना त्‍याचा फायदा होत नसून कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. नाटळ गावासाठी दोन लाईनमन द्यावेत आदी मागण्या केल्या.
महावितरण सांगवे कार्यालयात महावितरणतर्फे कार्यकारी अभियंता सौरभ माळी, उपकार्यकारी अभियंता संदीप पाटील, सहाय्यक अभियंता अविनाश तावडे, अमोघ थोरबोले तर संदेश उर्फ गोट्या सावंत, विजय भोगटे, माजी पंचायत समिती सदस्य राजू पेडणेकर, सांगवे सरपंच संजय उर्फ बाबू सावंत, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, नाटळ सरपंच सुनील घाडीगावकर, दारिस्ते उपसरपंच संजय सावंत, दिगवळे उपसरपंच तुषार गावडे, अमेय सावंत, राजू सापळे आदी उपस्थित होते.
---
ग्रामस्थांच्या इतर काही मागण्या
दिगवळे आणि दारिस्ते या गावांसाठी स्वतंत्र लाईनमन द्यावा. सांगवे कनेडी बाजारपेठ मधील लाईनमनच्या कामात सुधारणा न झाल्यास त्याची बदली करावी. सांगवे घोसाळवाडी येथे नवीन ट्रान्सफार्मर बसवावा आदी मागण्या केल्या. कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी ऑगस्ट पर्यंत कारभारात सुधारणा झालेली दिसेल. तसेच ग्राहकांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करू, अशी ग्‍वाही दिली. ५ ऑगस्टला सांगवे येथे वीज ग्राहकांचा मेळावा घेऊन ग्राहकांच्या समस्या ऐकून घेतल्‍या जातील, अशीही ग्‍वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com