मुख्याध्यापक परब यांचा आचरा प्रशाळेतर्फे सत्कार
swt3136.jpg
81353
आचरा ः गोपाळ परब यांचा निवृत्तीपर सत्कार करताना मान्यवर.
मुख्याध्यापक परब यांचा
आचऱा प्रशाळेतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १ः न्यू इंग्लिश स्कूल आचराचे मुख्याध्यापक गोपाळ परब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी नेहमी झटत होते. ते विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व होते, असे गौरवोद्गार मालवण पंचायत समितीच्या माजी सभापती आणि स्थानिक स्कूल समिती चेअरमन नीलिमा सावंत यांनी न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे व्यक्त केले.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचराचे मुख्याध्यापक परब नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याबद्दल स्थानिक स्कूल समिती आणि शिक्षक वर्गाकडून आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत स्कूल समिती सदस्य राजन पांगे, बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, रघुनाथ पाटील, अंकुशराव घुटुकडे, मधुरा माणगावकर, प्रकाश महाभोज उपस्थित होते.