कोकण
अमोल शिरसाट याचे निधन
अमोल शिरसाट याचे निधन
कुडाळ, ता. १ ः पिंगुळी-काळेपाणी येथील अमोल ऊर्फ वल्लभ श्रीरंग शिरसाट (वय ४१) याचे रविवारी (ता. २७) अल्पशा आजाराने रुग्णालयात निधन झाले. कवठी येथील सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणात त्याला अटक झाली होती. आठ दिवसांपूर्वी त्याला जामीन मिळाला होता. चार दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.