-रक्षाबंधनासाठी राजापूर बाजारपेठ सजली

-रक्षाबंधनासाठी राजापूर बाजारपेठ सजली

Published on

-rat१p१४.jpg-ः
२५N८१४४४
राजापूर ः राख्यांनी सजलेले दुकान.
----
रक्षाबंधनासाठी राजापूर बाजारपेठ सजली
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः बहीण-भावाच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणारे रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ग्रीटिंगकार्डपासून विविध गिफ्टपर्यंत तर विविध प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठ फुलून गेली आहे. फॅन्सी, स्टोन, कुंदन, डायमंड आदी विविध प्रकारच्या राख्या बाजारात दाखल झाल्या असून, पॅकिंगमधील राखीला बहिणींकडून अधिक पसंती मिळत आहे.
गेल्या काही वर्षामध्ये राख्या खरेदीमध्ये फॅशनचाही ट्रेंड दाखल झाला असून, आकर्षक रंगसंगती आणि फॅशनेबल राख्यांना अधिक पसंती मिळत आहे. त्यानुसार दुकानदारांनीही मागणी असलेल्या विविधांगी राख्या विक्रीसाठी दुकानांमध्ये ठेवल्याचे चित्र आहे. यामध्ये फॅन्सी, स्टोन, कुंदन, डायमंड आणि आकर्षक रंगसंगतीच्या राख्यांचा समावेश आहे. शेतीहंगामामुळे गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बाजारपेठेमध्ये खरेदी-विक्रीच्या उलाढालीच्या अनुषंगाने शांतता होती; मात्र, रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींकडून विविध प्रकारच्या राख्यांची खरेदी होणार असल्याने बाजारामध्ये पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी वीस ते पंचवीस टक्क्यांनी राख्यांचे दर वाढले आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com