रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचा ४ वर्षांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचा ४ वर्षांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

Published on

rat1p3.jpg
81393
रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. हरेराम त्रिपाठी. सोबत संचालक डॉ. दिनकर मराठे.
----------
जनमानसापर्यंत संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी प्रयत्न
डॉ. दिनकर मराठे; रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचा ४ वर्षांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राने गेल्या चार वर्षांत संस्कृत, योगशास्त्र, भारतीय ज्ञानपरंपरा, वैदिक गणित अशा विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे घेण्यात आली. हस्तलिखितांचे पुस्तकात रूपांतर, मॅपिंग प्रकल्प यशस्वी करण्यात आले. जनमानसापर्यंत संस्कृत भाषेचा प्रसार होण्याच्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती या केंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी दिली.
उपकेंद्राच्या स्थापनेला ४ वर्षे होत असल्याबद्दल डॉ. मराठे यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, २ ऑगस्ट २०२१ पासून हे उपकेंद्र स्थापन झाले. आजतागायत या उपकेंद्राच्यावतीने योगशास्त्र, संस्कृत, वास्तूशास्त्र, ज्योतिष, भारतीय ज्ञानपरंपरा, वैदिक गणित, वैदिक परंपरा, नाट्यशास्त्रविषयक अनेक कार्यक्रमांचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले.
जगातील सर्वात प्राचीन भाषा असणाऱ्या संस्कृत भाषेला पुन्हा सुगीचे दिवस यावेत यासाठी रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कार्यरत आहे. येथे योगशास्त्र, वास्तूशास्त्र, ज्योतिषशास्त्र, संस्कृत, नाट्यशास्त्रसारख्या विविध विषयांचे अभ्यासक्रम सुरू केले.
उपकेंद्रात दूरस्थ पद्धतीने १००हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. क्षेत्रीय वैदिक संमेलन, भारतीय ज्ञानपरंपरा व भारतीय गणित विषयावर कार्यशाळा उल्लेखनीय म्हणाव्या लागतील. बीए योगशास्त्राचे विद्यार्थी विनय साने यांनी विद्यापीठस्तरावर योगशास्त्र विषयात सुवर्णपदकाचे पटकावले. बीए योगशास्त्राचा विद्यार्थी विशाल गवस आशियायी योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ अ २८ ते ३५ वयोगटातून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. यापुढेही विद्यार्थी यश मिळवतील, असा विश्वास डॉ. मराठे यांनी व्यक्त केला.

चौकट
हस्तलिखिते, ग्रंथावर काम
शोधरत्नम्, भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत स्मृती प्रबंध, नवन्यायाशी संबंधित जागदीशी, न्यायेन्दुशेखर, गादाधरी यासारखी महत्वाची हस्तलिखिते पुस्तकरूपात प्रकाशित केली. लघुजातकम् आणि बृहद् वास्तूमाला यांचा शास्त्रीय पद्धतीचा मॅपिंग प्रकल्प पूर्ण करण्यात आला. न्यायदर्शन हस्तलिखित संपादन व प्रकाशन परियोजनेअंतर्गत एक प्रकल्प पूर्ण केला. सध्या केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाकडून प्राप्त धर्मशास्त्रविषयक संशोधन प्रकल्प सुरू आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com