रत्नागिरीला समाजसुधारणेचा मोठा वारसा
-rat१p१.jpg-
P२५N८१३९१
रत्नागिरी : सामाजिक शास्त्र मंडळाच्या कार्यक्रमात बोलताना राधेय पंडित. सोबत डॉ. तुळशीदास रोकडे, डॉ. कल्पना आठल्ये.
---
रत्नागिरीला समाजसुधारणेचा मोठा वारसा
राधेय पंडित ः ‘गोगटे’मध्ये सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : कोणत्याही शहराची ओळख त्या शहराच्या इतिहासातून होत असते. रत्नागिरी शहरास समाजसुधारणेचा मोठा वारसा लाभला आहे. प्राचीन काळापासून रत्नागिरी शहर विकसित होत गेले. वैचारिक भेद हे त्या काळातही होते आणि आजही आहेत; मात्र इथला समाज कालपरत्वे बदलत गेलाय, असे प्रतिपादन अभ्यासक राधेय पंडित यांनी केले.
गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन पंडित यांच्या हस्ते झाल्यानंतर (कै.) प्रा. संजय जोशी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. रत्नागिरीतील समाजसुधारकांच्या सामाजिक सुधारणांचा परिणाम आणि वर्तमानस्थिती त्यांनी मांडली. स्थानिक समाजसुधारकांच्या अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे, असे मत मांडले. कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक सामाजिक शास्त्र विभागाचे समन्वयक डॉ. तुळशीदास रोकडे यांनी केले.
---
चौकट
रोजगारसंधी उपलब्ध
डॉ. जगन्नाथ केळकर यांच्या कार्याचे संदर्भ देऊन रत्नागिरी शहरास भविष्यकाळासाठी तयार होताना अभ्यासपूर्ण नियोजनाची गरज असल्याचे सांगितले. सामाजिक शास्त्र विभागातील विद्यार्थांनी जाणीवपूर्वक वाचन करून प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. या कामी सर्वच सामाजिक शास्त्रे उपयोगी आहेत, असे मार्गदर्शन राधेय पंडित यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.