माजी सैनिकांच्या पाल्यांच्या नोंदणीसाठी आवाहन

माजी सैनिकांच्या पाल्यांच्या नोंदणीसाठी आवाहन

Published on

माजी सैनिकांच्या पाल्यांना आवाहन
रत्नागिरी ः एमबीबीएस व बीडीएस प्रवेशासाठी आपल्या पाल्याच्या नावनोंदणीसाठी केएसबी वेबसाईट बंद असल्यामुळे जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांच्या पाल्यांनी आपली नोंदणी www.desw.gov.in व www.dgrindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणीची प्रक्रिया १५ ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा कोषगार अधिकारी प्रविंद बिरादार तथा जिल्हा सैनिककल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये एमबीबीएस व बीडीएस प्रवेशासाठी आपल्या पाल्याच्या नावनोंदणीसाठी केएसबी वेबसाईट बंद असल्यामुळे यावर्षी DESW Website : www.desw.gov.in व DGR Website : www.dgrindia.gov.in वर नोंदणीची प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत सुरू आहे, तरी जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांच्या पाल्यांनी आपली नोंदणी www.dgrindia.gov.in व www.dgrindia.gov.in या संकेतस्थळावर करावी.

शाहीर संघाचा उद्या वर्धापन दिन
राजापूर ः येथील अनादीसिद्ध शक्‍तितुरा समाज शाहीर संघाचा वर्धापनदिन रविवारी (ता. ३) साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने सागरीत मांड व ब्रीदपूजा, नवीन सभासद नोंदणी, प्रमाणपत्र नूतनीकरण, शाहिरी वंशावळ नोंदणी आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीमध्ये अनादीसिद्ध शक्‍तितुरा समाज शाहीर संघ, राजापूरचे अध्यक्ष शाहीर चंद्रकांत वालम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हातिवले येथील श्रीदेव दत्तमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन अनादीसिद्ध शक्‍तितुरा समाज शाहीर संघाचे कार्यवाह संतोष हातणकर यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com