रत्नागिरी- अभ्यंकरमध्ये इतिहास शोध, बोध अभियान मंडळाचे उद्घाटन
‘अभ्यंकर’मध्ये इतिहास शोध,
बोध अभियान मंडळाचे उद्घाटन
रत्नागिरी, ता. १ : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय आणि गोगटे-जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी व्याख्यान दिले.
यावर्षीच युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश संरक्षित स्मारकामध्ये केला आहे. या किल्ल्यांची माहिती देणारे भित्तीपत्रक महाविद्यालयामध्ये प्रदर्शित करण्यात आले. निबंध स्पर्धेला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी राजेंद्रप्रसाद मसूरकर यांनी लोकसंग्रही लोकमान्य या विषयावर आपले विचार मांडले. निर्भिड पत्रकार, अभ्यासू वकील, लोकपुढारी म्हणून काम करताना लोकसंग्रह या टिळकांच्या पैलूवर प्रत्यक्ष घटना आणि त्याचे तपशील याद्वारे मसूरकर यांनी प्रकाश टाकला. जुन्या साहित्याचेही इतिहासप्रेमी विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी मंडळाचे पुढील सर्व कार्यक्रम कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे मिळून होतील, असे जाहीर केले. उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले.
निबंध स्पर्धेचा निकाल
कनिष्ठ महाविद्यालय प्रथम-आदिती पाटील (११वी विज्ञान), द्वितीय रिया पांचाळ (११वी विज्ञान), तृतीय श्रावणी खांडेकर (१२वी कला), उत्तेजनार्थ प्रणव हातिसकर (११वी वाणिज्य), तन्वी पाटकर (१२वी विज्ञान), सरगम कांबळे (१२वी कला.) वरिष्ठ महाविद्यालय प्रथम- सानिका पांचाळ, द्वितीय आसिया अत्तरवाले, तृतीय सृष्टी पाटील, उत्तेजनार्थ नेहा पवार.