राजापुरात मंगळवारी वारकरी दिंडी

राजापुरात मंगळवारी वारकरी दिंडी

Published on

-rat१p१३.jpg-
२५N८१४४३
राजापूर : अर्जुना नदी पात्रातील पुंडलिक मंदिर.
-----
राजापुरात मंगळवारी वारकरी दिंडी
श्रावणी एकादशीचे औचित्य; पुंडलिक मंदिरातून सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः श्रावणी एकादशीचे औचित्य साधून शहरातील पुरातन श्री विठ्ठल मंदिरामध्ये तालुक्यातील समस्त वारकरी मंडळींच्यावतीने भक्त मंदिर (पुंडलिक मंदिर) ते भक्ती मंदिर (विठ्ठल मंदिर) अशा वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याची वारकऱ्यांसह भाविकांना कायमच आस लागलेली असते. त्यासाठी अनेक भाविक दरवर्षी पंढरपूरची वारी मोठ्या श्रद्धेने करतात; मात्र, काही कारणास्तव वा वयोपरत्वे काही वारकऱ्यांना पंढरपूर वारी करणे शक्य होत नाही. अशा वारकऱ्यां‍सह विठ्ठलभक्तांना पंढरपूर वारीची अनुभूती मिळावी, त्या माध्यमातून विठ्ठलचरणी सेवा रूजू व्हावी, या उद्देशाने गतवर्षीपासून शहरामध्ये ‘भक्त मंदिर ते भक्ती मंदिर’ अशा वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावर्षी मंगळवारी (ता. ५) वारीचे आयोजन करण्यात आले आहे.
या वारीची सुरुवात सकाळी १० वाजता अर्जुना-कोदवली नद्यांच्या संगमतीरावरील प्रसिद्ध पुंडलिक मंदिर येथून वारीची सांगता प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या बाजारपेठ येथील पुरातन विठ्ठल मंदिर अर्थात ‘भक्ती मंदिर’ येथे होणार आहे. या वारीदरम्यान विठ्ठलभक्तांना रिंगणाचाही आनंद घेता येणार आहे. वारकरी दिंडी सोहळ्यामध्ये दादा राजापकर (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी सांप्रदाय-उन्हाळे, हर्डी, गोवळ, शिवणे, देवाचेगोठणे, पाथर्डे, कोदवली, सोलगाव या गावांतील वारकरी टाळ, वीणा, मृदंग गळ्यामध्ये घालून हरिनामाचा गजर करत पायी वारकरी दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यासोबत तालुक्यातील जास्तीत जास्त वारकऱ्‍यांनी या वारीमध्ये पारंपरिक वेशात सहभागी होऊन हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या वारीची अनुभूती घ्यावी, असे आवाहन दादा राजापकर (महाराज) व समस्त वारकरीबंधूंनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com