महिलांनी कर्ज घेऊन व्यवसायवृद्धी करावी
-rat१p१७.jpg-
२५N८१४४७
रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहकपेठेच्या श्रावण महोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन करताना संतोष सावंतदेसाई. सोबत प्राची शिंदे, गणेश धुरी व महिला उद्योगिनी.
---
महिलांनी कर्जाद्वारे व्यवसायवृद्धी करावी
संतोष सावंतदेसाई ः ग्राहकपेठच्या श्रावण महोत्सवाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : व्यवसायवाढीसाठी कर्जाची आवश्यकता असते. बॅंका नेहमीच कर्ज देताना ग्राहकाचे चारित्र्य, भांडवल व क्षमता पाहूनच कर्ज देते. आधीचे कर्ज कसे फेडले, व्यवहार पाहिले जातात. १० लाखांपर्यंतची मुद्रा कर्ज योजना आहे तसेच १ ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्याही कर्जयोजना आहेत. महिला उद्योगिनींनी या योजनांचा लाभ घेऊन व्यवसायवृद्धी करावी, असे आवाहन बॅंक ऑफ इंडियाचे निवृत्त विभागीय व्यवस्थापक संतोष सावंतदेसाई यांनी केले.
जयेश मंगल पार्क येथे रत्नागिरी ग्राहकपेठेतर्फे श्रावण महोत्सवानिमित्त आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी उद्योजिका कोमल तावडे, उद्योजक गणेश धुरी, अॅड. राजशेखर मलुष्टे, ओंकार रहाटे, रत्नागिरी ग्राहकपेठेच्या संचालिका संयोजिका प्राची शिंदे, माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय पटवर्धन आदी उपस्थित होते.
कोमल तावडे म्हणाल्या, या प्रदर्शनामुळे नवनवीन ओळखी होतात. त्यातून आपल्या वस्तूविक्रीला प्रोत्साहन मिळत असते. गणेश धुरी यांनी देखील या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल शिंदे यांचे कौतुक केले. अॅड. मलुष्टे यांनी महिला उद्योगिनींना विविध उत्पादने विक्रीसाठी शहर परिसरात अशा प्रकारची बाजारपेठ मिळावी याकरिता प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले. सूत्रसंचालन अनघा निकम यांनी केले. संध्या नाईक यांनी आभार मानले.